esakal | एका टेरेसवरून दुसऱया टेरेसवर; पाहा फटकेबाजी...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown girls take to rooftop tennis in italy

जगभरात कोरोना व्हायसरने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानतंर विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे अनेकजण घरामध्ये अडकून पडले आहेत. मात्र, वेळ घालवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्याय अवलंबताना दिसतात.

एका टेरेसवरून दुसऱया टेरेसवर; पाहा फटकेबाजी...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रोम (इटली): जगभरात कोरोना व्हायसरने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानतंर विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे अनेकजण घरामध्ये अडकून पडले आहेत. मात्र, वेळ घालवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्याय अवलंबताना दिसतात. संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

लॉकडाऊनमुळे चिमुकली 100 किमी चालली अन्...

इटली, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर तेथे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. भारतामध्येही ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नागरिक घरामध्ये बंदिस्त झाले आहेत. अनेकजण वेळ घालवण्यासाठी  इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा आधार घेताना दिसतात. पण, काही वेळानंतर त्याचा कंटाळा येतो. इटलीमधील दोन मुली एकमेकींच्या शेजारील इमारतीत राहातत. त्यांनी अनोख्या पद्धतीने टेनिस खेळत आपला वेळ घालवला. दोन वेगवेगळ्या इमारतीच्या टेरेसवरून या मुली टेनिस खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 'इटलीमधील लिगुरीयन येथील फिनाले लिगुरे या शहरामधील हा व्हिडिओ आहे. दोन वेगवेगळ्या इमारतींच्या टेरेसवरुन दोन मुली टेनिस खेळताना दिसत आहे. फोर हॅण्ड, बॅक हॅण्ड असे फटके मारताना दिसत आहेत. दोघी एका टेरेसवरुन दुसऱ्या टेरेसवर 12 शॉर्टची मॅच खेळल्या आहेत. पण, केवळ 24 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही मुली ज्या स्थानिक टेनिस क्लबलच्या सदस्य आहेत त्या क्लबने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. टेनिस खेळणाऱ्या मुलींचा नावे व्हिक्टोरीया आणि कॅरोला अशी आहेत. व्हिक्टोरीयाचे वडील मॅक्स ऑलिव्हरी यांनी व्हिडिओ शूट केला आहे.'

घरातला तांदूळ संपला म्हणून खाल्ला 12 फूटांचा किंग कोब्रा...

loading image
go to top