esakal | स्पेनमध्ये 24 तासांत सर्वाधिक बळी; लॉक डाऊन आणखी कडक
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus Spain outbreak change lock down policy till 9th April

स्पेनच्या आरोग्य खात्याने मृतांचा आकडा 6 हजार 500वर गेल्याची माहिती दिली आहे. सध्या देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 80 हजारांच्या आसपास आहे.

स्पेनमध्ये 24 तासांत सर्वाधिक बळी; लॉक डाऊन आणखी कडक

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मद्रीद Coronavirus: कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून सुरू झाली असली तरी युरोपमध्ये कोरोनानं रौद्र रुप धारण केलंय. इटलीनंतर फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी या देशांमध्येही कोरोनानं शिरकाव केलाय आणि तेथील बळींची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इटलीनंतर सर्वाधिक बळी स्पेनमध्ये गेले आहेत. स्पेनमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा असून, शनिवारी 24 तासांत 838 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमधील मृतांची संख्या आता 6 हजार 500च्यावर गेली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडलं स्पेनमध्ये?
स्पेनच्या आरोग्य खात्याने मृतांचा आकडा 6 हजार 500वर गेल्याची माहिती दिली आहे. सध्या देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 80 हजारांच्या आसपास आहे. अमेरिकेत सध्या सर्वाधिक एक लाखावर कोरोना रुग्ण आहेत. त्या खालोखाल इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांनी लॉक डाऊनचे नियम आणखी कडक केले आहेत. शनिवारपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यात जीवनाश्यक क्षेत्रातील कामगारांशिवाय इतर कोणिही घराबाहेर पडणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलंय. हे नियम 9 एप्रिलपर्यंत लागू असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित आहे. या निर्णयामुळं कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या घटण्यास खूप मोठी मदत होईल, असं मत सँचेज यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या निवेदनात म्हटलंय. येत्या काही दिवसांत आपल्याला एकत्रितपणे या आव्हानाचा सामना करायचा आहे, असंही सँचेज यांनी म्हटलंय. 

आणखी वाचा - ब्रिटनमध्ये परिस्थिती बिघडली, लॉकडाऊन जूनपर्यंत जाणार?

चीनमधून आले मास्क
स्पेनमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता असल्यामुळं स्पेनच्या मदतीला चीन धावला आहे. चीनमधून आरोग्य क्षेत्रातील साहित्यासह मास्कची मदत पाठवण्यात येत आहे. मद्रिदमध्ये सध्या चीनहून 10 लाख मास्क दाखल झाले आहेत. पण, स्पेनपुढे सध्या आयसीयूमधील पेशंटवरील उपचारांची सगळ्यांत मोठी समस्या आहे, अशी कबुली आरोग्य खात्यातील प्रमुख अधिकारी फ्रर्नांडो सिमॉन यांनी दिलीय. युरोपमध्ये सध्या इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. इटलीतील स्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही. पण, स्पेन त्यातून वेळीच धडा घेत असल्याचे सांगितले जात आहे. 

आणखी वाचा - जगातील पहिली घटना, अमेरिकेत बालकाचा मृत्यू 

युरोपीय महासंघाला आवाहन
युरोपमध्ये कोरोनानं थैमान घातल्यामुळं स्पेननं युरोपीय महासंघाकडं दाद मागितली आहे. महासंघाने कोरोनाशी लढताना, आर्थिक आणि सामाजिक अशी संयुक्त स्ट्रॅटेजी करावी, असं मत स्पेनच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलं. स्पेनसह फ्रान्स, इटली, जर्मनी हे मोठ मोठे देश कोरोना व्हायरसमुळं अक्षरशः हतबल झाले आहेत. सध्या तरी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणताही आशेचा किरण दिसत नाहीय.

loading image
go to top