भारतात अद्याप उद्रेक नाही - जागतिक आरोग्य संघटना

पीटीआय
Sunday, 7 June 2020

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा काळ तीन आठवडे आहे. त्यामुळे ही उद्रेकाची स्थिती नाही, असे आरोग्य संघटनेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मायकेल रायन यांनी सांगितले. ‘भारतात विविध भागांत कोरोनाचा प्रभाव वेगवेगळा आहे. ग्रामीण आणि शहरी भागानुसारही परिस्थिती बदलत आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तान, बांगलादेश या देशांतही कोरोनाचा उद्रेक झाला नसला तरी येथे धोका मात्र कायम असेल,’ असे रायन यांनी सांगितले. भारतात लॉकडाउनमुळे संसर्ग नियंत्रणात आणण्यास मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यूयॉर्क - भारतात कोरोना संसर्गाचा उद्रेक अद्याप झालेला नाही मात्र, सर्व व्यवहार सुरू होऊन लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने संसर्गाचा वेग वाढण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा काळ तीन आठवडे आहे. त्यामुळे ही उद्रेकाची स्थिती नाही, असे आरोग्य संघटनेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मायकेल रायन यांनी सांगितले. ‘भारतात विविध भागांत कोरोनाचा प्रभाव वेगवेगळा आहे. ग्रामीण आणि शहरी भागानुसारही परिस्थिती बदलत आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तान, बांगलादेश या देशांतही कोरोनाचा उद्रेक झाला नसला तरी येथे धोका मात्र कायम असेल,’ असे रायन यांनी सांगितले. भारतात लॉकडाउनमुळे संसर्ग नियंत्रणात आणण्यास मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर

भारतात का आहे धोका?
1) व्यवहार सुरु झाल्याने गर्दी वाढत आहे
2) मजुरांचे स्थलांतर
3) दाट लोकसंख्या

भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी आहे. भारताने फक्त रुग्ण संख्या वाढीचा दर वेगवान होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- सौम्या स्वामिनाथन, प्रमुख शास्त्रज्ञ, डब्लूएचओ

राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल

आणखी रुग्ण सापडतील
वॉशिंग्टन - भारत आणि चीनसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या घेतल्या ते त्या देशांमधील रुग्णसंख्या अमेरिकेच्याही पुढे जाईल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. सध्या जगातील सर्वाधिक रुग्ण आणि कोरोना बळी अमेरिकेत आहेत.

येथे एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत आतापर्यंत दव कोटी चाचण्या झाल्या आहेत. ही संख्या जर्मनीतील चाचण्यांच्या चौपट आहे. चाचण्यांची संख्या जितकी अधिक, तितके रुग्ण अधिक सापडत असल्याचे स्पष्ट आहे. भारत आणि चीनमध्ये चाचण्या वाढवल्या तर तेथील रुग्णसंख्या अमेरिकेलाही मागे टाकेल. सरकारी आकडेवारीनुसार, अमेरिकेत १९ लाख रुग्ण असून एक लाख नऊ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात २.३६ लाख, तर चीनमध्ये ८४ हजार रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत ४० लाख चाचण्या झाल्या आहेत.

अमेरिकेची चाचणी घेण्याची क्षमता प्रचंड असल्यानेच रुग्णसंख्या अधिक दिसत आहे. आम्ही आर्थिक आणि आरोग्याच्या आघाडीवर नक्कीच यशस्वी होऊ.
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus There is no outbreak in India yet WHO