अमेरिकेच्या सैन्यतळावर इराकमध्ये रॉकेट हल्ला

पीटीआय
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

इराकमधील किर्कुक प्रांतातील अमेरिकी सैन्याच्या तळावर गुरुवारी रात्री रॉकेट डागण्यात आल्याची माहिती इराकी आणि अमेरिकी सैन्य दलांशी संबंधित सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. या रॉकेट हल्ल्यात नेमकी किती जीवित हानी झाली याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. किर्कुक प्रांतातील अमेरिकी सैन्याच्या के-वन तळावर गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास रॉकेटद्वारे हल्ला झाला.

किर्कुक (इराक) - इराकमधील किर्कुक प्रांतातील अमेरिकी सैन्याच्या तळावर गुरुवारी रात्री रॉकेट डागण्यात आल्याची माहिती इराकी आणि अमेरिकी सैन्य दलांशी संबंधित सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. या रॉकेट हल्ल्यात नेमकी किती जीवित हानी झाली याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. किर्कुक प्रांतातील अमेरिकी सैन्याच्या के-वन तळावर गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास रॉकेटद्वारे हल्ला झाला. या घटनेनंतर संबंधित सैन्य तळावर अतिशय कमी उंचीवर अमेरिकी सैन्याची हेलिकॉप्टर फिरत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील वर्षी २७ डिसेंबर रोजीही याच तळावर सुमारे ३० रॉकेटचा मारा करण्यात आला होता. त्यात एक अमेरिकी नागरिक ठार झाला होता. या हल्ल्यास जबाबदार धरत इराणचा पाठिंबा असलेल्या कतीब हिज्बुल्ला या स्थानिक कट्टरवादी संघटनेच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यात २५ जण मारले गेले होते. त्यानंतर कट्टरवाद्यांनी बगदादमधील अमेरिकी दूतावासाबाहेर हिंसाचार घडवून आणला होता. त्यानंतर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराकचा लष्करप्रमुख कासीम सुलेमानी आणि कतीब हिजबुल्लाचा सहसंस्थापक अबू महदी अल मुहांदीस हे ठार झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rocket attack in Iraq on US military base