esakal | Coronavirus: जपानमध्ये डायमंड प्रिन्सेस जहाजावर चिंताजनक स्थिती; 350 जणांना लागण
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus updates diamond princess ship japan 350 people affected

Coronavirus: जपानमध्ये डायमंड प्रिन्सेस जहाजावर चिंताजनक स्थिती; 350 जणांना लागण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

टोकिया : जपानच्या किनाऱ्यावर उभी असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवर एका पाठोपाठ एकाला कोरोनो व्हायरसची लागण होत असल्याचं दिसत आहे. या जहाजावर भारतीयांचाही समावेश असून, आठ प्रवासी आहे तर जवळपास 160 क्रू मेंबर्स आहेत. या भारतीयांपैकीही काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण न झालेल्या जहाजावरील वृद्ध प्रवाशांना जपान सरकारने त्यांच्या देशात प्रवेश दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डायमंड प्रिन्सेस क्रुझवर ३५५ जणांना लागण 
डायमंड प्रिन्सेस क्रुझवर ३५५ प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. क्रुझवरील १२१९ जणांची चाचणी घेण्यात आली होती. ५ फेब्रुवारीपासून योकोहामाच्या बंदरावर डायमंड प्रिन्सेस क्रुझ थांबविण्यात आली आहे. या जहाजात ५० देशांतील एकूण ३७०० प्रवासी आहेत. हॉंगकॉंगने आपल्या रहिवाशांना परत नेण्याची तयारी केली आहे. हॉंगकॉंगचे ३३० नागरिक असून त्यांना चार्टर प्लेनने नेण्याचा विचार केला जात आहे. कॅनडानेदेखील विमान पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ज्यांना बाधा झाली आहे, त्यांना परवानगी दिली जाणार नाही. 

आणखी वाचा - चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक कायम, 24 तासांत 2 हजार जणांना लागण

अमेरिकी नागरिकांना बाहेर काढणार
गेल्या काही दिवसांपासून जहाजावर कोरोनाचा धोका असल्यामुळं तेथून आमची सुटका करावी, अशी मागणी भारतीयांनी सरकारकडे केली होती. सध्या जपान सरकारने जहाजावरील कोणालाही जपानमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळं जहाजावर अडकलेल्या भारतीयांना तेथेच थांबण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान, अमेरिकेने त्या जहाजावरील आपल्या नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, ही सुटका कोणत्या मार्गाने कधी करण्यात येणार याविषयी अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

loading image