Coronavirus : आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं; धन्यवाद ! : मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray talk about corona virus maharashtra

घराबाहेर पडू नका असं सांगणारा माणूस पुन्हा एकदा तुमच्या समोर आला आहे. आज जवळपास आठ दिवस होत आले. संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या संपूर्ण दिवसांमध्ये आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं आ, त्यामुळे आपलं धन्यवाद ! असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Coronavirus : आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं; धन्यवाद ! : मुख्यमंत्री

मुंबई : घराबाहेर पडू नका असं सांगणारा माणूस पुन्हा एकदा तुमच्या समोर आला आहे. आज जवळपास आठ दिवस होत आले. संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या संपूर्ण दिवसांमध्ये आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं आ, त्यामुळे आपलं धन्यवाद ! असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकासआघाडी सरकारमधील सर्व नेत्यांसह विरोधी पक्ष, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मानले. सरकारने 24 तास जीवनावश्यक वस्तूंची दुकान सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जर या वस्तूंच्या दुकानात गर्दी कमी झाली नाही. तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

धक्कादायक ! दारुच्या तुटवड्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा एक लक्षात घ्या. माझ्यासोबत आपण सर्व आहात. माझ्यासोबत महाविकासआघाडी सरकारमधील सर्व नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे सर्व आहेत. विरोधीपक्ष नेत्यांशी देखील माझी चर्चा सुरु आहे. या सर्वांचे धन्यवाद, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सर्व कामगार आपल्या घऱी जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. पण इतर राज्यातील मजूर, कर्मचाऱ्यांनी जिथे आहे तिथेच थांबावे. त्यांच्यासाठी राहण्याची, मोफत जेवणाची महाराष्ट्र सरकार सोय करत आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १०००च्या पार; तर बळींचा आकडा...

जीवनावश्यक वस्तू 24 तास सुरु आहेत, पण विनाकारण पोलिसांवर ताण वाढवू नका, सरकार आपली मदत करत आहे, आपणही सरकारची मदत करा. केंद्राकडूनही चांगली मदत होत आहे. तसेच पुण्यातील डॉक्टरांचं कौतुक आहे. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा, त्यांच्याशी बोलून माझं मनोधैर्य वाढतं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची बाब, पण आता न्युमोनियाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे. हे संकट मोठं आहे. याला लढण्यासाठी आपण एक वेगळे अकाऊंट तयार केले आहे. अनेकजण स्वत: हून पुढे येऊन सरकारला मदत करत आहे. कोणता देश कोणाच्या मदतीला धावून येईल माहीत नाही. आपण आपल्यासाठी मदत करायाला पाहिजे आहे. इतर देशांची अवस्था पाहून आपण आपल्या देशात काळजी घेत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. सर्व बाजूने यंत्रणा सुसज्ज आहे. जर या लढाईत पुढचे पाऊल टाकावे लागले. त्यासाठी आपण सज्ज आहोत. तुम्ही घराबाहेरचे टेन्शन घेऊ नका तुम्ही घरात रहा. आपण सगळे मिळून आपण आपले काम करा, कुटुंबासोबत हसत खेळत कॅरम, चेस, गाण्याच्या भेंड्या खेळा, असेही ठाकरे म्हणाले.

loading image
go to top