esakal | अमेरिकेत कोरोना रुग्णांना दिलं जातंय 'हे' औषध!

बोलून बातमी शोधा

Donald-Trump

कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एक लाखांपर्यंत जाऊ शकते, असा इशारा येथील संसर्गरोग तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिका सरकारने आता ज्या भागांमध्ये अद्याप संसर्ग फारसा नाही, तेथे ‘सोशल डिस्टन्सिंग’ची कडक अंमलबजावणी करण्याची तयारी सुरु केली आहे.

अमेरिकेत कोरोना रुग्णांना दिलं जातंय 'हे' औषध!
sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एक लाखांपर्यंत जाऊ शकते, असा इशारा येथील संसर्गरोग तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिका सरकारने आता ज्या भागांमध्ये अद्याप संसर्ग फारसा नाही, तेथे ‘सोशल डिस्टन्सिंग’ची कडक अंमलबजावणी करण्याची तयारी सुरु केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘हायड्रोक्लोरोक्विन’ गेम चेंजर?
मलेरियावर औषध म्हणून वापरले जाणारे ‘हायड्रोक्लोरोक्विन’ हे न्यूयॉर्कमधील कोरोनाबाधितांना दिले जात असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ‘गेम चेंजर’ ठरू शकणाऱ्या या औषधाचा चांगला परिणाम दिसून येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. न्यूयॉर्कमधील अकराशे रुग्णांना प्रयोग म्हणून हे औषध दिले असून त्याचे साइड इफेक्ट अत्यंत कमी प्रमाणात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील प्रसिद्ध संसर्ग रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी सावधगिरीची सूचना दिली आहे. ‘अमेरिकेत लक्षावधी रुग्ण वाढणार आहेत. सध्याचा रुग्णवाढीचा वेग पाहता हे शक्य आहे. आतापर्यंत आढळलेल्या अनेक रुग्णांमधील लक्षणे सौम्य असली तरी वृद्धांना धोका अधिक आहे,’ असे ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही येत्या दोन आठवड्यांत संसर्गाचा फैलाव सर्वोच्च क्षमतेने होईल, असा इशारा दिला आहे. त्यांनी आज ‘व्हाइट हाऊस’मध्ये बैठक घेत ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या आदेशाचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे. तसेच, एक जूनपासून अमेरिकेतील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरवात होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांमध्ये ५१८ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत एकाच दिवसांत मृत्यु पावणाऱ्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.