दिलासादायक! अमेरिकेत कोरोनावरील लस प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या अंतिम टप्यात

Moderna
Moderna

वॉशिंग्टन - मॉडर्ना ही अमेरिकी कंपनी कोरोनावर तयार करीत असलेल्या लशीमुळे उंदरांचे विषाणू संसर्गापासून रक्षण होत असल्याचे दिसून आले आहे. नेचर या निकतयकालीकात बुधवारी शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार mRNA-1273 असे नाव असलेल्या लसीमुळे SARS-CoV-2 विषाणूपासून संरक्षण होते. लस तयार करणाऱ्या संशोधकांसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शीयस डिसीजेस या अमेरिकेतील संस्थेच्या तज्ञांनाही हे आढळले. तीन आठवड्यांच्या अंतराने एक मायक्रोग्रॅमचा डोस स्नायूंच्या पेशीजालात दिल्यानंतर तटस्थ प्रतिपिंड तयार झाली. मग अतिरिक्त प्रयोग झाले. त्यावेळी एक मायक्रोग्रॅमची दोन इंजेक्शन देण्यात आली. मग पाच ते १३ आठवड्यांच्या अंतराने विषाणूचा संसर्ग घडविण्यात आला. त्यानंतर दुसरे इंजेक्शन देण्यात आले असता फुप्फुस आणि नाकात विषाणूच्या प्रतिकृती तयार झाल्या नसल्याचे आढळले.

सात आठवड्यांनी एक मायक्रोग्रॅमचा एकच किंवा दहा मायक्रोग्रॅमचा एक डोस देण्यात आला असतानाही फुप्फुसाचे संसर्गापासून रक्षण होत असल्याचे आढळले.

विषाणूमधील प्रथिनांच्या निमुळत्या भागाचे आण्विक स्वरूप निश्चीत करण्यासाठी या संस्थेच्या लस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि ऑस्टीनमधील टेक्सास विद्यापीठाचे तज्ञ एकत्र आले. या स्वरूपाचा लसनिर्मितीमध्ये वापर करण्यात आला.

किंमत २४०० ते २८००
मॉडर्ना बायोटेक कंपनी कोरोनावरील लशीच्या संशोधनात आघाडीवर आहे. संभाव्य लस प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या अंतिम टप्यात आहे. जागतिक साथीच्या काळातील दरानुसार लसीची किंमत दोन हजार 400 ते दोन हजार 800 रुपये या घरात असेल. सध्या जगातील अनेक देशांच्या सरकारबरोबर सामुहिक पातळीवर लस पुरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. इतका दर देण्याची क्षमता असली किंवा नसली तरी लस उपलब्ध व्हावी म्हणून ही चर्चा आहे, असे कंपनीचे सीइओ स्टीफन बॅन्सेल यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com