व्हिडिओ पाहून डोळ्यात येतं फक्त पाणीच...

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

एकमेकांवर किती प्रेम असू शकते, याचा अनुभव अनेकजण घेत आहेत. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात फक्त पाणी येत असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

बीजिंग (चीन): एकमेकांवर किती प्रेम असू शकते, याचा अनुभव अनेकजण घेत आहेत. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात फक्त पाणी येत असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

दोघांच्या प्रेमाला कोरोना व्हायरची नजर लागली आणि एकमेकांचा निरोप घ्यावा लागला. रुग्णालयात शेवटच्या क्षणी 80 वर्षांच्या जोडप्याने एकमेकांच्या हातात हा घेत अखेरचा श्वास सोडला. दोघांनाही कोरोना व्हायरसने ग्रासले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोघांनी शेवटच्या क्षणी एकमेकांच्या हातात हात घेऊन श्वास सोडला. यावरून दोघांचे एकमेकांवर किती प्रेम होते, हे पाहायला मिळते. रुग्णालयात उपस्थित असणाऱ्यांनी हा भावुक क्षण कॅमेऱयात कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. काळजाला भिडणारा हा व्हिडिओ पाहून युझर्सलाही अश्रू अनावर झाले आहेत.

पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहिलं अन् केला स्फोट...

ट्विटर युझर जियांग नावाच्या युवकाने हा व्हिडिओ सोमवारी (ता. 3) अपलोड केला आहे. या व्हिडिओला 28 हजारांहून अधिक लाईक्स असून, 15 हजारांपेक्षा जास्त जणांनी रिट्वीट केला आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुलाच्या प्रेयसीवर गेली बापाची वाईट नजर अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus video viral lovely couple of husband and wife say bye at hospital