युरोपमधील या देशांमध्ये शिथील होतोय लॉकडाउन

European countries,  economies, lockdown, COVID 19 virus, coronavirus
European countries, economies, lockdown, COVID 19 virus, coronavirus

युरोप कोरोना विषाणूच्या मोठ्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी घेतलेल्या लॉकडाउनमधून बाहेर पडत हळूहळू अर्थकारण पूर्वपदावर आणावे यासाठी युरोपातीस राष्ट्रांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. युरोपात कोरोनाने मृत्यू तांडव पाहायला मिळाले होते. जीवघेण्या विषाणूच्या संकटातून सावरल्यानंतर याठिकाणी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी टप्प्याटप्यातून लॉकडाउन शिथील करण्यात येत आहे. काही राष्ट्रे आजही सावध पावले उचलताना दिसते. 11 मे नंतर युरोपातील अनेक राष्ट्रांमध्ये काही प्रमाणात निर्बंध हटवण्यास सुरुवात करण्यात आली. विविध गोष्टींवरील निर्बंधामुळे जीवनमानासह अर्थव्यवस्था ठप्प होण्याची वेळ ओढावली आहे. जीवनमान पूर्वपदावर आणून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी खबरदारीपूर्वी पावले युरोपीय राष्ट्र टाकताना दिसतात. नजर टाकूयात युरोपातील कोणत्या राष्ट्रांत लॉकडाउनची काय स्थिती आहे यावर...  

अंडोरा
फ्रान्स आणि स्पेन यांच्यादरम्यान असलेला युरोपातील एक छोटासा देश असलेल्या अंडोरा देशाने अनोखी पद्धत अवलंबल्याचे पाहायला मिळते. लॉकडाउनच्या दरम्यान घराबाहेर पडण्याची परवानगी देताना या राष्ट्रात 'सम-विषम' सूत्राचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी असलेल्या घराच्या क्रमांकावरुन कोणी कधी बाहेर पडावे याची आखणी करण्यात आली आहे. सम तारखेला सम क्रमांकाच्या घरातील लोकांना तर विषम तारखेस विषम घर क्रमांक असणाऱ्या घरातील लोक बाहेर पडू शकतात, असा अनोखा फंडा काढत लॉकडाउन शिथीलता करण्याची सुरुवात या छोट्याशा राष्ट्रात करण्यात आली आहे.   
 

ऑस्ट्रिया
1 मेपासूनच ऑस्ट्रियामध्ये लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आहे.  सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना एकमेकांमध्ये किमान 1 मीटर अंतर ठेवावे या निर्बंधाचे पालन करत अत्यावश्यक गोष्टींसाठी लोकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.  15 मे पासून रेस्टॉरंट्स तर 29 मे पासून हॉटेल व्यवसाय सुरु करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अर्थव्यवस्था पटरीवर आणण्यासाठी लॉकडाउन दरम्यान काही निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यास पुढाकार घेणारा ऑस्ट्रिया हा युरोपमधील पहिला देश आहे. 

 श्रीमंत देश असूनही नागरिक मोफत फूड पाकिटासाठी रांगेत, कोठे ते वाचा सविस्तर​

बेल्जियम
बेल्जियममध्ये काटेकोरपणे लॉकडाउनचे पालन करण्यात आले. मेच्या सुरुवातीपासून काही प्रमाणात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी टप्प्याटप्याने शिथीलता देण्यात येत आहे. 10 मे पर्यंत चार जवळचे मित्र आणि नातेवाईकांना एकमेकांना भेटण्याची परवानगी सरकारने दिली होती. 18 मे पासून किनारपट्टी आणि अन्य काही पर्यटन स्थळे खुली करण्यासाठी बेल्जियम प्रयत्नशील आहे. 8 जूनपासून बार आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करु असे सरकारने म्हटले आहे. लॉकडाउनमधून हळूहळू बाहेर पडत असताना सप्टेंबरपर्यंत कोणत्याही सामूहिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नसल्याचे बेल्जियम सरकारने स्पष्ट केले आहे.  

झेक प्रजासत्ताक
24 एप्रिलपासूनच झेक प्रजासत्ताकमधील निर्बंध हळूहळू हटविण्यास सुरुवात झाली होती. 11 मेपासून याठिकाणी मोकळ्या जागेत असलेले बार आणि रेस्टॉरंट्स उघडण्याची परवानगी देण्यात आली.  25 मे पर्यंत जवळजवळ सर्व व्यवसाय पूर्वपदावर आणण्याचे हालचाली याठिकाणी सुरु आहेत.  

डेन्मार्क
कडक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत 11 मे पासून डेन्मार्कने शॉपिंग सेंटर सुरू करण्यात आली. लॉकडाउनमधून बाहेर पडण्याच्या ते दुसऱ्या टप्प्यात आहेत. याठिकाणी नर्सरी आणि प्राथमिक शाळा तसेच डे केअर सेंटर पुन्हा सुरू झाले आहे. छोट्या व्यवसायांना खबरदारीच्या अटीवर  20 एप्रिलपासूनच सूट देण्यात आली होती. डेन्मार्क हा लॉकडाउनची अंमलबजावणी करणारा युरोपातील पहिला देश आहे. 2 एप्रिल रोजी डेन्मारकच्या संसदेत पंतप्रधान मेट्टे प्रेडरिकेसन यांनी लॉकडाउनची घोषणा केली होती.  
 

जर्मनी
२० एप्रिलपासून लॉकडाउनचे निर्बंध कमी करण्याच्या दृष्टीने जर्मनीने पहिले पाऊल उचलले. ऑटो उत्पादन क्षेत्रासह  इतर लहान-सहान उद्योगांना याठिकाणी शिथीलता देण्यात आली. आगामी आठवड्यात  रेस्टॉरंट्स, हॉटेल्ससह ओस पडलेली क्रीडा मैदानावर स्पर्धा घेण्यास जर्मनीत परवानगी देण्यात येणार आहे.  निर्बंध कमी होण्यास सुरवात झाल्यापासून याठिकाणी कोरोनाविषाणूचे संक्रमण पुन्हा वाढल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले. मात्र योग्य त्या खबरदारीसह लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा संकल्प जर्मनीने कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. देशांतर्गत सेवा सुरळीत करत असताना जूनच्या मध्यापर्यंत परदेशातून कोणीही जर्मनीत दाखल होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.  

ब्रिटनमध्ये या तारखेपर्यंत वाढवला लॉकडाउन​

ग्रीस

लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश कलेल्या ग्रीसमध्ये 11 मार्चपासूनच  काही दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. कपडे, हार्डवेअर आणि ब्युटी प्रॉडक्ट स्टोअर्ससह किरकोळ व्यवसाय पुन्हा रुळावर येत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन या सर्व गोष्टी होताना दिसताहेत. मेच्या सुरुवातीपासून खेळाच्या मैदानात स्पर्धा घेण्यासाठी विशेष अटीवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र १ जून पर्यंत याठिकाणी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग सेंटर उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही. 

हंगेरी
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण कमी प्रमाणात आहेत, अशा ठिकाणी घरातून बाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार आहे. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑरबान यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ही घोषणा करताना त्यांनी कोणतीही निश्चित तारीख सांगितली नव्हती. यावेळी त्यांनी  ग्रामीण भागातील स्टोअर उघडण्याचे तास वाढवण्याची तसेच कॅफे आणि रेस्टॉरंट्स खुली करण्यास परवानगी दिली होती.   

आयर्लंड
1 मे पासून आयर्लंडने देशातील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला. आणखी दोन आठवडे कठोर निर्बंधाचे पालन करावे लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, अशी सूचनाही सरकारकडून देण्यात आली आहे.  याठिकाणी लोकांना घराबाहेर व्यायाम करण्याची परवानगी दिली आहे. पण 2 किमी अंतर ठेवण्याची मर्यादा आता 5 किमी इतकी करण्यात आली आहे.  

इटली
इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी देशाची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी 26 एप्रिल रोजीच खास वेळापत्रक जाहीर केले होते. यात सातत्याने सुधारणा करत इटली संकटजन्य परिस्थितीतून सावरताना दिसते. कारखाने, बांधकाम क्षेत्र आणि घाऊक पुरवठा व्यवसाय पूर्ववत सुरु करण्याची परवानगी याठिकाणी देण्यात आली आहे. सार्वजनिक उद्याने आणि बगीचे खुली करण्यासाठी 4 मे रोजी परवानगी देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी याठिकाणी मर्यादित प्रवेश दिला जात आहे. सद्यपरिस्थिती कायम राहिल्यास 1 जूनपासून रेस्टॉरंट्स, कॅफेलाही परवानगी देण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.   

लिथुआनिया
लिथुआनियन सरकारने 11 मार्चपासूनच देशव्यापी लॉकडाउनच्या काळातील निर्बंत हळूहलू हटवण्यास सुरुवात केली होती.  याठिकाणी  संग्रहालय, ग्रंथालय, मोकळ्या जागेत असणारे कॅफे, शॉपिंग मॉल्समधील किरकोळ स्टोअर खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेच्या मध्यापर्यंत विमानसेवा सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 

चीनवर वारंवार का भडकत आहेत डोनाल्ड ट्रम्प? हा त्यांचा प्लॅन तर नाही ना? 

नेदरलँड्स

या ठिकाणी सरकारने 11 मे पासून प्राथमिक शाळा अर्धवेळ सुरु करण्याची परवानगी दिली. संगीत महोत्सव आणि व्यावसायिक फुटबॉलसारख्या सर्व मोठ्या स्पर्धा 1 सप्टेंबरपर्यंत स्थगित राहतील असे आदेश सरकारने काढले आहेत. 20 मे पर्यंत बार आणि रेस्टॉरंट्सही बंद राहणार आहेत.  

पोलंड
 4 मे पासून पोलंडमधील शॉपिंग सेंटर आणि हॉटेल्स खुली झाली आहेत. शाळा आणि अन्य काही दुकांने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून याठिकाणी अध्यक्षयीन निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात मतदान घेणे शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.  
 

स्पेन
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच स्पेनमध्ये मोठा फटका बसला होता. कोरोना रुग्णांचे आकडे आवाक्यात आल्यानंतर सरकारने संकटजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी वेगवेळी धोरणं आखली आहे.  कठोर लॉकडाउनंतर मेच्या सुरुवातीच्या टप्प्यात  छोटी दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटकांची निवासस्थाने खुली करण्यात आली आहेत. 11 मेपासून काही ग्रामीण भागातील बार आणि रेस्टॉरंट्स खुली करण्याची परवानगी देण्यात आली.    

स्वीडन
याठिकाणी लोक मोकळेपणाने फिरू शकतात.  शाळा, बार आणि रेस्टॉरंट्स खुली करण्यात आली आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कायम आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात 50 हून अधिक लोकांना एकत्र येण्यास अद्यापही बंदी आहे. 
 

युनायटेड किंगडम
 10 मे रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देशातील लॉकडाउनमधील निर्बंध काहीप्रमाणात शिथील करण्याचा निर्णय घेतला. सध्या लागू असलेले कठोर निर्बंध हटवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून टप्प्याटप्याने लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा प्लॅन ब्रिटन सरकार आखत आहे.  23 मार्चपासून लागू असलेला लॉकडाउन खुला करण्यासाठी सरकारव दबाव आहे. लॉकडाउन हटवल्यास कोरोना विषाणूचा धोका संभवण्याची शक्यता पंतप्रधानांनी वर्तवली आहे. त्यामुळे याठिकाणी आणखी काही दिवस लॉकडाउन कायम राहणार आहे. 

European countries,  economies, lockdown, COVID 19 virus, coronavirus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com