Coronavirus:जगाचं टेन्शन वाढलं; चीनमध्ये बळींची संख्या 4 हजार; पाहा कोठे काय घडले!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 10 मार्च 2020

जगभरात शंभराहून अधिक देशात १ लाख १० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

बीजिंग Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये गेल्या चोवीस तासांत १७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ११ वर पोचली आहे. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे वुहान शहराला भेट देत आहेत. कोरोना आजाराचा उद्रेक झाल्यानंतर शी जिनपिंग हे प्रथमच वुहानला येत आहेत. या वेळी ते वैद्यकीय अधिकारी, सैनिकी अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवक यांना भेटणार आहेत. याशिवाय रुग्ण आणि स्थानिक नागरिकांची पाहणी करणार असल्याचेही वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, चीनच्या अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसने गेल्या चोवीस तासांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ४ हजारांवर पोचल्याचे सांगितले. जगभरात शंभराहून अधिक देशात १ लाख १० हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारपर्यंत ८० हजारांहून अधिक नागरिकांना बाधा झाली होती तर आतापर्यंत ६० हजार नागरिकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आल्याचे सांगितले गेले.

आणखी वाचा - ज्योतिरादित्यांचा राजीनामा आणि काँग्रेसची माधवराव शिंदेंना आदरांजली

दक्षिण कोरियात १५० रुग्ण 
सोल :
कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या दक्षिण कोरियात दीडशेहून अधिक नागरिकांना बाधा झाल्याचे उघडकीस आले असून दोन आठवड्यातील ही सर्वाधिक संख्या मानली जात आहे. सोमवारपर्यंत १३१ जणांना लागण झाल्याचे म्हटले आहे. एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५४ वर पोचली आहे. देशभरात आतापर्यंत ७, ५१३ जणांना बाधा झाली आहे. 

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगोलियात पहिला रुग्ण 
उलनबाटर : जगातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता मंगोलियात खबरदारी घेतली जात आहे. मात्र कोरोनाबाधित एक रुग्ण आढळून आला असून तो रशियाहून आलेला आहे. तो फ्रान्सच्या ऊर्जा कंपनीत काम करणारा कर्मचारी आहे. 

आणखी वाचा - ज्योतिरादित्यांची बंडखोरी की काँग्रेसचं अपयश?

दोन हजार अब्ज डॉलरचे नुकसान 
वॉशिंग्टन : कोरोनामुळे यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला सुमारे २ हजार अब्ज डॉलर नुकसान होण्याची शक्यता व्यापार आणि विकाससंस्थेने व्यक्त केली आहे. या आजारामुळे काही देशात मंदी येऊ शकते आणि जागतिक विकास दर कमी होऊन अडीच टक्के राहू शकतो, असे भाकितही केले गेले आहे.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डायमंड प्रिन्सेसचा पहिला प्रवासी बाहेर 
ऑकलंड : कोरोना व्हायरसचा गेल्या महिनाभरापासून सामना करणाऱ्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरचा पहिला प्रवासी आज कॅलिफोर्नियातील ओकलँड बंदरवर उतरला. डायमंड प्रिन्सेस जहाज जपानच्या किनाऱ्यावर थांबून ठेवण्यात आले होते. या जहाजावर तीन हजारांहून अधिक प्रवासी होते. या वेळी बंदरावर आपत्कालीन सोय करण्यात आली होती. रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी आदी तैनात करण्यात आले होते. कॅलिफोर्नियातील ९०० प्रवासी असून ते एक दोन दिवसांत सोडवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus worldwide update china death toll rises four thousand