esakal | जगभरातील कोरोनाबाधित २३ लाखांवर; जाणून घ्या जगात कोठे काय घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus worldwide update usa europe maximum deaths

भारताने जगातील अन्य काही देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे कोरोनावर उपकारक ठरणारे औषध द्यायला सुरवात केली आहे.

जगभरातील कोरोनाबाधित २३ लाखांवर; जाणून घ्या जगात कोठे काय घडले!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन Coronavirus : कोरोनाच्या संसर्गाचा जबर फटका अमेरिका आणि युरोप खंडाला बसला असून येथील संसर्ग काही केल्या कमी होताना दिसत नाही. रोज बाधित आणि बळींची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हानांमध्येही मोठी भर पडताना दिसून येते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जगभरातील बाधितांची संख्या २३ लाखांवर गेली असून आत्तापर्यंत १ लाख ६० हजारजणांचे मृत्यू झाले आहेत. एकट्या युरोप खंडामध्ये एक लाखांपेक्षाही अधिक मृत्यू झाले असून यात इटलीतील २३ हजार २२७ , स्पेनमधील २० हजार ६३९ इतक्या मृतांचा समावेश आहे. जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृतांपैकी ६२.५ टक्के मृत्यू हे एकट्या युरोपातील आहेत तर एकूण बाधितांमध्ये अमेरिकेतील एक तृतीयांश बाधितांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता जगभरातील सेलेब्रिटी पुढे आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकी गायिका लेडी गागा हिने १२७.९ दशलक्ष डॉलरचा निधी कोरोनाविरोधातील लढाईसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

आणखी वाचा - ऑनलाईन शॉपिंग संदर्भात महत्त्वाची बातमी

‘यूएई’ने मानले आभार 
भारताने जगातील अन्य काही देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन हे कोरोनावर उपकारक ठरणारे औषध द्यायला सुरवात केली असून ५५ लाख गोळ्यांची पहिली खेप आज संयुक्त अरब अमितरातीला (यूएई) रवाना झाली असून ‘यूएई’च्या सरकारनेही आज याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. भारत लवकरच आणखी काही देशांना ही मदत पाठवू शकतो. 

आणखी वाचा - उद्यापासून राज्यात काही उद्योगांना परवानगी!

न्यूयॉर्कला जबर फटका 
अमेरिकेमध्ये एका दिवसामध्ये २९ हजार ७७ जणांना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला बसला असून येथे मागील चोवीस तासांमध्ये ५४० लोकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. येथे आत्तापर्यंत सतरा हजारांपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही राज्यांनी लॉकडाउन शिथिल करण्यास विरोध केला असून काही राज्यांतील लोक या निर्बंधांविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. 

जगात कोठे काय घडले?

  • सिंगापूरमध्ये रविवारी नवीन 596 रुग्णांची नोंद; त्यात भारतीयांचा आकडा अधिक 
  • पाकिस्तानात गेल्या चोविस तासांत 514 नवीन कोरोनाचे रुग्ण; पाकिस्तानात 50 लॅब असून, रोज 6 हजार जणांच्या तपासण्या 
  • बांगलादेशमध्ये मौलानाच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा गर्दी उसळली; लॉकडाउनचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलिस बडतर्फ 
  • फ्रान्समध्ये शनिवारी एका दिवसात 642 जणांचा मृत्यू झाला; 364 जण हॉस्पिटलमधील, तर 278 जण नर्सिंग होममध्ये होते 
  • कोरोनाच्या लढाईत मद्य उपायकारक ठरत असल्याने दक्षिण आफ्रिकेत मद्यविक्री सुरू करण्याचे सरकारचे संकेत 
  • न्यूयॉर्कमधील कोरोनाच्या मृत्यूच्या आकड्यात घट 
  • अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या राजवाड्यातील 20 कामगारांना कोरोनाचा संसर्ग; घनी यांचा अहवाल निगेटिव्ह 
  • स्पेनमधील लॉकडाउन 9 मेपर्यंत वाढविण्याचे पंतप्रधानांचे संकेत; देशात 20 हजार 43 जणांचा मृत्यू 
  • इटलीमध्ये गेल्या चोविस तासात 3 हजार 491 नवीन रुग्ण; युरोपात सर्वांत जास्त मृत्यू इटलीमध्ये; मृत्यांचा आकडा 23 हजार 227 
  • युरोपमधील बळींची संख्या एक लाखाच्या वर 
loading image
go to top