संकटजन्य परिस्थितीनंतर हा देश फुटबॉल स्पर्धेसाठी सज्ज 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 मे 2020

कोरोनामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेच्या संकटात आता दिलासादायक वृत्त आहे. कोरोनामुळे ओस पडलेल्या मैदानात पुन्हा खेळाचा थरार रंगणार असून ही संकटाला मात करण्याची चाहूलच म्हणावी.

सेऊल :जगभरात वेगाने होणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाची शृंखला तोडून लॉकडाऊनमधून कधी सुटका होणार? असा प्रश्न भारतासह विविध राष्ट्रांतील नागरिकांना सतावत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेच्या संकटात आता एक दिलासादायक वृत्त आहे. कोरोनामुळे ओस पडलेल्या मैदानात पुन्हा खेळाचा थरार रंगणार असून ही संकटाला मात करण्याची एक चाहूलच म्हणावी लागेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दक्षिण कोरियामधील लोकप्रिय फुटबॉल लीगला शुक्रवारपासून सुरु होत आहे. जगभरात विस्कळीत झालेली जीवनमान हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिने खेळाच्या मैदानातून शुभ संकेत दिसत आहेत. यापूर्वी तीन दिवसांपूर्वी दक्षिण कोरियात बेसबॉल लीगला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले होते. 29 फेब्रुवारीला नियोजित असणारी फुटबॉल लीग कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली होती. यादिवशी दक्षिण कोरियात  909 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचीही पुष्टी झाली होती. 

दागिन्यांनी सजलेल्या दुकानात दिसताहेत कांदे, बटाटे...

कठोर नियमांचे पालन करुन दक्षिण कोरियाने एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक अंकावर आणला होता. फुटबॉल अधिकारी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत होते. कोरोनाग्रस्तांच्या आकडा हा 30 च्या घरात असेल तर स्पर्धा घ्यायला हरकत नाही, अशी भूमिका दक्षिण कोरियातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी घेतली होती.  परिस्थिती आवाक्यात असल्यामुळे अखेर स्पर्धेसमोरील संकट हटले असून शुक्रवारी रात्री ज्योंजू शहरात गत चॅम्पियन ज्योनबुक मोटर्स आणि सुओन ब्लूविंग्स यांच्यात लीगमधील पहिला सामना रंगणार आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खेळाची मैदाने अक्षरश: ओस पडली आहेत. भारतीय क्रिकेटमधील लोकप्रिय स्पर्धा आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. जगातील मानाची स्पर्धा समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धाही कोरोनाच्या संकटामुळे  2021 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय युरोपातील स्पर्धाही स्थगित करण्यात आल्या होत्या. दक्षिण कोरियातील खेळाची मैदानात माहोल नेमका कसा राहिल? याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी स्पर्धा सुरु होणार असल्यामुळे जगभरात एक सकारात्मक ऊर्जा निश्चित मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronvirus lockdown football tournament will start in south korea