या देशाने कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण मिळताच संपूर्ण गावच केले लॉक

यूएनआय
Monday, 27 July 2020

दक्षिण कोरिया लक्ष्य
किम यांना कोरोनाचा देशात शिरकाव झाला असे वाटते, पण यास दक्षिण कोरियातून परतलेला घुसखोर जबाबदार असल्याचा त्यांचा दावा आहे. गरिबी आणि राजकीय दडपशाहीला कंटाळून अनेक नागरिक दक्षिण कोरियात पळून गेले आहेत. त्यांना रोखण्याच्या उद्देशाने किम यांनी हा बनाव रचल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सोल - दक्षिण कोरियाच्या सीमेजवळील काएसाँग गावात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण मिळताच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आणीबाणी लागू करून संपूर्ण गावच लॉकाडाऊन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर झाल्यास तो किंवा ती उत्तर कोरियातील पहिला रुग्ण ठरेल. आपल्या देशात अद्याप एकही कोरोना रुग्ण नसल्याचे उत्तर कोरियाने ठामपणे सांगितले असले तरी परदेशी तज्ञांनी त्याविषयी नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अमेरिकी दूतावासाचे पॅकअप

केसीएनए (कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी) या सरकारी वृत्तसंस्थेनुसार संशयित व्यक्ती कित्येक वर्षांपूर्वी दक्षिण कोरियात पळून गेली होती. नंतर ती गेल्या आठवड्यात उत्तर कोरियात बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून परतली. त्या व्यक्तीच्या लाळेचे व रक्ताचे नमुने घेण्यात आले असून संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शनिवारी किम यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन आणीबाणीच्या रोगप्रतिबंधात्म उपाययोजनेची जागा आणीबाणीने आणि उच्च पातळीच्या दक्षतेने घेतल्याचे जाहीर केले.

ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो अखेर कोरोनामुक्त

दरम्यान, उत्तर कोरियाने जाहीर केलेल्या माहितीबद्दल दक्षिण कोरियाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास इन्कार दर्शविला.

दक्षिण कोरिया लक्ष्य
किम यांना कोरोनाचा देशात शिरकाव झाला असे वाटते, पण यास दक्षिण कोरियातून परतलेला घुसखोर जबाबदार असल्याचा त्यांचा दावा आहे. गरिबी आणि राजकीय दडपशाहीला कंटाळून अनेक नागरिक दक्षिण कोरियात पळून गेले आहेत. त्यांना रोखण्याच्या उद्देशाने किम यांनी हा बनाव रचल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

दक्षिण कोरियाला लक्ष्य करून किम जोंग उन यांनी राजनैतिक दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. चीन तसेच प्योंगयांगशी संबंधित विषयांपासून संसर्गाची चर्चा शत्रू देशाकडे वळविण्याचाही त्यांचा डाव असावा.
- लैफ-एरिक एस्ली, सोलमधील प्राध्यापक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: country locked the whole village it got the first suspected patient of corona