अमेरिकी दूतावासाचे पॅकअप

यूएनआय
Monday, 27 July 2020

चीनवरील निष्ठेची प्रचिती
दूतावासाच्या परिसरातून जाणाऱ्या काही व्यक्तींनी चीनवरील निष्ठा जोरदार व्यक्त केली. यात एक प्रतिक्रिया लक्षवेधी होती. वित्त क्षेत्रातील झाओ नामक 25 वर्षीय तरुणी म्हणाली की, आमचा देश खूप ताकदवान आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता आमच्या यंत्रणांकडे आहे. मला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची क्षमता देशाकडे आहे.

चेंगडू - चीनमधील चेंगडू येथील अमेरिकी वाणिज्य दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी कार्यालय खाली करण्यास प्रारंभ केला. दूतावासाबाहेर कडेकोट बंदोबस्तामुळे वातावरण तणावपूर्ण होते. ह्युस्टनमधील चीनी वकिलातीमध्ये अमेरिकी सुरक्षा अधिकाऱ्यांना सक्तीने प्रवेश करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अधिकाऱ्यांनी आधीच आवराआवर केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेने ह्यूस्टनमधील चीनी वकिलात बंद करण्याचे फर्मान सोडल्यानंतर चीनने जशास तसे प्रत्यूत्तर दिले. तिबेटजवळील सिचुआन प्रांतातील चेंगडूचा दूतावास बंद करण्यासाठी अमेरिकेला सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली.

अमेरिकी कर्मचाऱ्यांनी त्यापूर्वीच आवराआवर सुरु केली. रविवारी बरेच ऊन असूनही अनेक स्थानिक नागरिकांनी दुतर्फा वृक्ष असलेल्या रस्त्यावर गर्दी केली होती. त्याचवेळी तेथे साध्या वेशातील सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे दूतावासाचा परिसर म्हणजे जणू काही छोटे पर्यटन स्थळ असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

'पाकने केलेला नरसंहार अन् लाखो महिलांवरील बलात्कार देश विसरलेला नाही'

काही जणांनी फोटो तसेच व्हिडिओ घेतले. गर्दी वाढताच पोलिसांनी लोकांना निघून जाण्याची सूचना दिली. त्यानंतर थोड्याच वेळात रस्ता नेहमीच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. फर्निचर तसेच सामान वाहून नेणारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वाहनानांच प्रवेश होता.

शनिवारी दूतावासाच्या प्रांगणात एक व्हॅन होती, जी रविवारी सकाळी बाहेर काढून दुसरीकडे रवाना झाली. त्यात सामना काय होते किंवा कोण व्यक्ती होत्या याचा तपशील मिळू शकला नाही. त्याआधी शुक्रवारपासून दूतावासाचे कर्मचारी हातात किमान एक बॅग घेऊन ये-जा करीत होते.

चीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा

63 वर्षीय स्थानिक वृद्ध यांग म्हणाला की, चीनने जसा प्रतिसाद मिळाला तसाच परत केला. जी परिस्थिती उद्भवली ती खेदजनक आहे.

19 वर्षीय विद्यार्थी झांग चुहान याने सांगितले की, अमेरिकी इथेच थांबणार नाही अशी भिती मला वाटते. परिस्थिती आणखी बिघडेल.

जियांग नावाच्या तरुणाने सांगितले की, आमच्या देशाची कृती मला मान्य आहे. अमेरिकेने आमची वकिलात बंद केली. त्यामुळे आम्ही त्यांची बंद केलीच पाहिजे होती.
काही संकेतस्थळांवरील वृत्तानुसार दूतावासाबाहेरील बोधचिन्ह खाली काढण्यात आले. एकूण तीन व्हॅन आत आल्या होत्या. 

कोरोनाच्या संकटात अमेरिकेला हन्नामुळे आणखी एक धोका

चीनवरील निष्ठेची प्रचिती
दूतावासाच्या परिसरातून जाणाऱ्या काही व्यक्तींनी चीनवरील निष्ठा जोरदार व्यक्त केली. यात एक प्रतिक्रिया लक्षवेधी होती. वित्त क्षेत्रातील झाओ नामक 25 वर्षीय तरुणी म्हणाली की, आमचा देश खूप ताकदवान आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता आमच्या यंत्रणांकडे आहे. मला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची क्षमता देशाकडे आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Embassy Packup