ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो अखेर कोरोनामुक्त

पीटीआय
Monday, 27 July 2020

बोल्सोनारो 65 वर्षांचे आहेत. आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्यांनी सकाळी एक छायाचित्र पोस्ट केले. सर्वांना सुप्रभात असे सांगत त्यांनी Sars-Cov2च्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जाहीर केले. ही चाचणी कधी झाली याचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. त्यांचा चेहरा हसरा आहे. हॉयड्रॉक्सीक्लोरोक्वीन या मलेरियावरील गोळीचा कोरोनावर उपयोग होत असल्याचे अद्याप वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यात ब्राझीलमधील प्रयोगांमध्ये या गोळीमुळे ह्रदयाचे ठोके अनियमितपणे कमी-जास्त होतात असे आढळून आले आहे.

ब्रासिलीया - ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले आहे. त्याचवेळी कोरोनावरील उपयुक्तता सिद्ध न झालेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळीचे त्यांनी समर्थन केल्यामुळे वाद कायम राहिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सात जुलै रोजी बोल्सोनारो यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी अध्यक्षीय निवासस्थानातच स्वयं-विलगीकरण केले होते. एका आठवड्याच्या आत कंटाळा आल्याचे वक्तव्यही त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या दोन चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

'पाकने केलेला नरसंहार अन् लाखो महिलांवरील बलात्कार देश विसरलेला नाही'

बोल्सोनारो 65 वर्षांचे आहेत. आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्यांनी सकाळी एक छायाचित्र पोस्ट केले. सर्वांना सुप्रभात असे सांगत त्यांनी Sars-Cov2च्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जाहीर केले. ही चाचणी कधी झाली याचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही. त्यांचा चेहरा हसरा आहे. हॉयड्रॉक्सीक्लोरोक्वीन या मलेरियावरील गोळीचा कोरोनावर उपयोग होत असल्याचे अद्याप वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यात ब्राझीलमधील प्रयोगांमध्ये या गोळीमुळे ह्रदयाचे ठोके अनियमितपणे कमी-जास्त होतात असे आढळून आले आहे.

चीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा

हा तर कारावास
स्वयं-विलगीकरण सुरु केल्यानंतर काही दिवसांत कंटाळा आल्याचे व हा तर स्वतःच लादून घेतलेला कारावास असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. 

दुचाकीवरून फेरफटका
अल्वोरादा पॅलेस या अध्यक्षीय प्रासादात बोल्सोनारो व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून काम पाहात होते. गुरुवारी कंटाळा आल्यामुळे त्यांनी दुचाकीवरून फेरफटका मारला. त्याचवेळी प्रासादाबाहेरील मैदानाची निगा राखणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पथकाबरोबर ते गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता.

कोरोनाच्या संकटात अमेरिकेला हन्नामुळे आणखी एक धोका

फेसबुक पोस्ट
बोल्सोनारो यांनी याच सुमारास फेसबुकवर एक संदेश टाकला. आपल्याला छान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी काळजी घ्यायला हवी, पण भितीच्या छायेत जगण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. लोकांचा जीव वाचविण्याची काळजी आम्हाला आहे, पण लॉकडाउनमुळे घरी थांबण्याच्या धोरणामुळे होणारे अप्रत्यक्ष नुकसान विषाणूपेक्षा जास्त लोक मारण्यास कारणीभूत ठरेल.

विरोधी पक्षाची टीका
डाव्या विचारसरणीच्या सोशीयालीझम-लिबर्टी पार्टीचे नेते मार्सेलो फ्रॅक्सो यांनी बोल्सोनारो यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, बोल्सोनारो यांचा राक्षसीपणा यातून दिसून येतो. त्यांना ब्राझीलीयन जनतेच्या जिवाची पर्वा नाही.

‘उष्णकटीबंधातील ट्रम्प’
कोरोनाच्या जागतिक साथीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या खालोखाल वाद झालेले राष्ट्रप्रमुख म्हणून बोल्सोनारो यांचा उल्लेख केला जातो. किरकोळ ताप असा उल्लेख करीत त्यांनी मास्कच्या वापराकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. लॉकडाउनमुळे उद्भवणारे आर्थिक संकट विषाणूपेक्षा घात असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे उष्णकटीबंधातील ट्रम्प असा त्यांचा उल्लेख झाला होता. मार्चमध्ये त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, पण सात जुलै रोजी त्यांना संसर्ग असल्याचे निदान झाले. त्यांच्या एकूण त्यांच्या तीन चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. अखेरीस त्यांना 20 दिवस स्वयं-विलगीकरण करून घ्यावे लागले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazil President jair bolsonaro finally released Corona