

Empire State Tower Proposal
esakal
Empire State Tower climb : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील १ हजार ४५४ फूट उंच एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या ट्रान्समिशन टॉवरवर दोन स्टंटबाजांनी कोणतेही सुरक्षा साहित्य न वापरता चढाई केल्याची घटना घडली. टॉवरवर शांततेचा संदेश देणारा बॅनर फडकावल्यानंतर युवकाने आपल्या महिला साथीदाराला लग्नासाठी प्रपोज करत किस केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून न्यूयॉर्क पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.