डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा झटका; बायडेन यांच्याविरोधातील याचिका फेटाळली

Donald Trump
Donald Trump

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका दिला आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या राज्यांत ज्यो बायडेन यांचा विजय झाला. या निकालाला डोनाल्ड ट्रम्‍प यांच्या वतीने आव्हान दिले होते. हा निकाल बदलण्याची मागणी याचिकेद्वारे केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता.१०) फेटाळली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टेक्सासमधील ॲटर्नी जनरल केन पॅक्सटोन यांनी ही याचिका ट्रम्प याच्या पाठिंब्याने केली होती. जॉर्जिया, मिशिगन, पेनसिल्व्हानिया आणि व्हिस्कॉन्सिन या राज्यांनी बायडेन यांच्या बाजून मतदान केल्याने येथे ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला. येथील निकाल रोखून त्यात सुधारणा करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. पण ती फेटाळण्यात आली. या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी घेणे आवश्‍यक असले तरी टेक्सासच्या दाव्यात काहीही तथ्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सॅम्युएल अलिटो आणि क्लॅरेन्स थॉमस यांनी ट्रम्प यांना सुनावले. या खटल्याला रिपब्लिक पक्षाच्या १२६ सदस्यांनी समर्थन दिले होते. 

अमेरिकेचे अध्यक्षपदी ज्यो बायडेन हे ५३८ पैकी ३०६ मतांनी निवडून आले आहेत. मात्र या निवडणुकीत पराभव मान्य न करता मतदानात फसवणूक झाल्याचा आणि अवैध मतदान झाल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी त्यांनी न्यायालय गाठले असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ट्रम्प यांना  धक्का बसला आहे.  

कायदेशीर बदनामी - ट्रम्प
याचिका फेटाळल्याने संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी ‘सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला खाली खेचले आहे. यात काहीही हुशारी नाही, कोणतेही शौर्य नाही,’ असे ट्विट केले आहे. हा निकाल म्हणजे कायदेशीर बदनामी असून अमेरिकेसाठी अडचणीचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com