कोरोना होणार हंगामी आजार; हर्ड इम्युनिटी आधी अनेक लाटांची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

समूह प्रतिकारशक्ती गाठली जाईल तेव्हा कोरोना विषाणूंच्या संक्रमणात मोठ्या प्रमाणावर घट होईल आणि हंगामानुसार त्यात चढ-उतार दिसून येतील. 

दुबई - समशीतोष्ण हवामान असलेल्या देशांमध्ये कोरोनाच्या काळात समूह प्रतिकारशक्‍ती निर्माण झाली आणि परिस्थिती अनुकूल झाल्यावर हा विषाणूजन्य आजार हंगामी होण्याची शक्यता आहे, मात्र तोपर्यंत कोरोनाचा प्रसार सर्व ऋतुमध्ये होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनात म्हटले आहे.

‘फ्रटिंयर्स इन पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या समीक्षा संशोधनात म्हटले आहे की, लोकसंख्येतील मोठ्या गट जेव्हा कोरोना व्हायरसपासून मुक्त होईल आणि समूह प्रतिकारशक्ती गाठली जाईल तेव्हा कोरोना विषाणूंच्या संक्रमणात मोठ्या प्रमाणावर घट होईल आणि हंगामानुसार त्यात चढ-उतार दिसून येतील. ‘‘कोरोना आता कायम राहणार आहे. जोपर्यंत समूह प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत याची उद्रेक सातत्याने होतच राहणार आहे,’’ असा इशारा लेबनॉनमधील अमेरिकन युनिर्व्हसिटी ऑफ बैरूतमधील संशोधक आणि या अभ्यास लेखाचे ज्येष्ठ लेखक हसन झराकर यांनी दिला.

हे वाचा - 'गरजू देशांना आधी लस मिळणं महत्त्वाचं, भारताची भूमिका मोलाची असेल'

लोकांना आता कोरोनाबरोबर जगणे शिकायला हवे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे, हात धुणे, एकत्र न जमणे आदी सर्व उपाय केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

अभ्यासातील निरीक्षणे
- फ्लूसारख्या श्‍वसनासंबंधीच्या विषाणूंपेक्षा कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा वेग जास्त.
- संक्रमाणाच्या वेगामुळे उन्हाळ्यातही कोरोनाचा प्रसार कमी झाला नाही.
- अन्य कोरोना विषांणूप्रमाणे कोविड-१९ हा आजार हंगामी होण्याची शक्यता.
- लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाच्या संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण आखाती देशांमध्ये नोंदविले गेले.

हे वाचा - धक्कादायक! ई-कॉमर्ससह भारताच्या न्यायव्यवस्थेवर चीनचे लक्ष

समूह प्रतिकारापूर्वी कोरोनाच्या अनेक लाटा येऊ शकतात. याधीच्या संशोधनाच्या अभ्यास केला असता कोरोनाप्रमाणेच श्‍वसनासंबंधीचा ‘सार्स सीओव्ही-२’ हा आजाराचे स्वरूपही विशेषतः समशीतोष्ण प्रदेशांत ऋतुमानाप्रमाणे बदलत जाणारे आहे. एन्फ्लुएंझा (शीतज्वर) आणि अनेक प्रकारचे कोरोना विषाणू ज्यांच्यामुळे ताप येतो त्यांच्या प्रभाव समशीतोष्ण भागांत हिवाळ्यात जास्त असला तरी ते उष्णकटिबंधीय प्रदेशात वर्षभर त्यांचे चक्र सुरू असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID-19 become seasonal virus but not yet scientists predict