esakal | कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

COVID 19 situation update worldwide as of 24 May 2020

फ्रान्समधील प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी अमेरिकेतील मृतांचा आकडा मात्र वाढला आहे.

कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना वेगवेगळ्या देशात मात्र काय सध्या काय परिस्थिती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. फ्रान्समधील प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी अमेरिकेतील मृतांचा आकडा मात्र वाढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

फ्रान्समधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात 
पॅरिस : फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. फ्रान्समध्ये सध्या १ लाख ८२ हजार ४६९ कोरोनाबाधित रुग्ण असून आत्तापर्यंत २८ हजार ३३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या पच आठवड्यांमध्ये येथील नवीन बाधितांचा आकडा वेगाने उतरत असल्याचे दिसून आले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. 
--------
वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योतीने फेटाळला क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव
--------
भारतीय शास्त्रज्ञांची कमाल; तयार केला विषाणू नष्ट करणार मास्क; एवढी आहे किंमत
--------
अमेरिकेतील मृतांचा आकडा वाढला 

न्यूयॉर्क : कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या अमेरिकेत कोरोनामुळे आत्तापर्यंत ९८ हजार ६८३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रविवारी दिली असून बाधितांचा आकडाही १६ लाखांच्या घरात गेल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) रविवारी नवी आकडेवारी जाहीर केली असून या आकडेवारीनुसार अमेरिकेतील बाधितांचा आकडा १६ लाख ६६ हजार ८२९ वर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. तर, आत्तापर्यंत ४ लाख ४६ हजार ९२७ जण यातून पूर्णपणे बरे झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

स्पेनमधील बाधितांच्या आकड्यात वाढ 
माद्रिद : स्पेनमधील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असून गेल्या २४ तासांमध्ये ४६६ नवीन रुग्ण सापडल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे देशातील बाधितांचा आकडा २ लाख ३५ हजार २९० वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे येथील मृतांचा आकडा २८ हजार ६७८ वर पोहोचला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. स्पेनने देशातील अनेक भागांमधील लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेतला असून माद्रिद आणि बार्सिलोना या प्रमुख शहरांमध्ये मात्र लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

इटलीत रुग्णांचे प्रमाण घटले 
रोम : इटलीमध्ये गेल्या २४ तासांत ११९ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली असून यामुळे येथील मृतांचा आकडा ३२ हजार ७३५ वर पोहोचला असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली असून इटलीत रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून नवीन रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. तसेच इटलीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६५२ रुग्णांची नोंद झाली असून यामुळे देशातील कोरोनाबाधितांच आकडा २ लाख २९ हजार ३२७ वर पोहोचली आहे. 

ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांत २८२ जणांचा मृत्यू 
लंडन : ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये २८२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली असून यामुळे देशातील मृतांचा आकडा ३६ हजार ६७५ वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांमधील नवीन बाधितांच आकडा अद्याप ब्रिटनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केला नसून देशात आत्तापर्यंत २ लाख ५७ हजार १५४ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. तर, १ हजार ५५९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले.