esakal | भारतीय शास्त्रज्ञांची कमाल! तयार केला चक्क विषाणू नष्ट करणारा मास्क; किंमत अवघी...
sakal

बोलून बातमी शोधा

mask.

देशात कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना आरोग्य यंत्रणा आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांना सुरक्षेसाठी पीपीई कीट परिधान करावे लागते.

भारतीय शास्त्रज्ञांची कमाल! तयार केला चक्क विषाणू नष्ट करणारा मास्क; किंमत अवघी...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई ः देशात कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना आरोग्य यंत्रणा आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांना सुरक्षेसाठी पीपीई कीट परिधान करावे लागते. मात्र तरीही अनेक डॉक्टर, नर्सेसला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय काही ठिकाणी तर आरोग्यसेवकांना पुरेशी सुरक्षा साधने मिळत नसल्याचीही तक्रार केली जाते.

मोठी बातमी ः  वडिलांना सायकलवरून घेऊन जाणाऱ्या ज्योती फेटाळला चक्क क्रीडामंत्र्यांचा प्रस्ताव; सांगितले महत्वाचे कारण

या सर्व समस्यांवर मात करत कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याचा अथवा त्याला निष्क्रीय करणारा मास्क तयार केल्याचा दावा बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेने केला आहे. या तीनस्तरीय मास्कवर विषाणू तसेच बॅक्टेरिया प्रतिबंधक कोटिंग असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे विषाणू तसेच बॅक्टेरिया प्रतिबंधक कोटिंग असलेले तसेच किंमतही आवाक्यात असलेले बहुस्तरीय मास्क आवश्यक होते. सध्या उपलब्ध असलेले मास्क महागडे आहेत त्याचबरोबर विषाणूंचा प्रसार रोखण्यास कमी पडत आहेत, त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. 

मोठी बातमी ः कोरोना नियंत्रणासाठी धारावीत जम्बो क्वारंटाईन सेंटर; किती खाटा असणार आहेत? 

वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने पीपीई कीटची चणचण भासत असल्याचे बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेस कळवले होते. त्यांच्या सूचनेनुसार मास्कबाबत संशोधन करण्यास सुरुवात झाली आणि त्यातून हा नवा मास्क तयार झाला आहे. कोरोना रोखण्यात सर्वात प्रभावी मानला जात असलेला एन-95 या मास्कची किंमत 400 ते 600 रुपये आहे तर कापडापासून तयार केलेला हा तीनस्तरीय कोटिंग असलेला मास्क अवघ्या 22 रुपयांना उपलब्ध होऊ शकेल, असे सांगण्यात आले.

मोठी बातमी ः ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार; कोरोनामुक्त रुग्णाला दाखवले पुन्हा पॉझिटीव्ह

एन-95 किंवा त्याप्रकारचे अन्य मास्कमध्ये शरीरात प्रवेश करणारे फिल्टर्स असतात. ते  बॅक्टेरिया तसेच विषाणूंना नाकावाटे प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात. मात्र पीपीई काढताना, हाताळताना, तो नष्ट करताना जीवंत विषाणूंमुळे बाधा होऊ शकते, याकडे कौशिक चॅटर्जी यांनी लक्ष वेधले. चॅटर्जी हे भारतीय विज्ञान संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ मटेरियल्स इंजिनिअरिंग विभागात सहप्राध्यापक आहेत. एन 95 मास्कमध्ये विषाणू किंवा बॅक्टेरिया प्रतिबंधक नसतात. त्याचे फायबर इलेक्ट्रोस्टॅटिकली (electrostatically) चार्ज  असते. प्रामुख्याने विषाणू हे नकारात्मक चार्ज असतात. विषाणू किंवा बॅक्टेरिया मास्कच्या संपर्कात येतात तेंव्हा ते निष्क्रीय होतात आणि श्वसनमार्गामध्ये प्रवेश करु शकतात, असे संस्थेच्या मटेरियल इंजिनिअरिंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक सूर्यसारथी बोस यांनी सांगितले. 

मोठी बातमी ः ...म्हणून म्हाडाच्या रखडलेल्या प्रकल्पांना देण्यात आली परवानगी!

भारतीय विज्ञान संस्थेने तयार केलेले त्रिस्तरीय मास्क वेगळे आहेत. त्याच्या सर्वात बाहेरच्या स्तरावर नॅनोफायब्रस पॉलीमर मेमब्रेन आहे. ते गरजेनुसार बदललेल्या पॉलीस्टरवर आहे. या मेमब्रेनमुळे पहिला स्तर हायड्रोफोबिक होतो. त्यामुळे विषाणूकडून काही द्रव पदार्थ सोडला गेला तरी त्यास प्रतिबंध केला जातो. मधल्या स्तरावरही नॅनोफायब्रस मेमब्रेन आहे. मात्र त्याला विषाणू आणि बॅर्टेरिया प्रतिबंधकांची साथ देण्यात आली. ते पहिल्या स्तरातून पार केलेल्या विषाणू आणि बॅक्टेरियांना निष्क्रिय करतात. तिसरा तसेच सर्वात आतील स्तर हा कॉटन फॅब्रिक आहे. त्यामुळे या मास्कचा त्रास होत नाही. नॅनोफायब्रस मेमब्रेन हे बायोडिग्रेडेबल पॉलीमरपासून तयार केलेले आहेत. त्याचवेळी विषाणू आणि बॅक्टेरिया प्रतिबंधकास मान्यता आहे. 

मोठी बातमी ः राज्यात कोरोनाचा 'विस्फोट' ! रुग्णसंख्येने गाठला आजपर्यंतचा सर्वाधिक 'उच्चांक', तर इतक्या जणांचा...

मास्कचा सर्वात वरचा स्तर हा हायड्रोफोबिक असल्यामुळे विषाणूंना दुसऱ्या स्तरावर येण्यास वेळ लागतो. विषाणू दुसऱ्या अर्थात मधल्या स्तरावर आल्यावर विषाणू प्रतिबंधक त्यांना 30 मिनिटात मारतात आणि ते दोन तासात पूर्ण नष्ट होतात, असे बोस यांनी सांगितले. मास्कवरील कोटिंग औद्योगिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मोजण्यात आले आहे. त्याची चाचणी संस्थेतील प्रयोगशाळेत झाली आहे. बंगळूर येथील कंपनीने कोटिंग तंत्रज्ञान देण्यास मंजूरी दिली आहे. याची निर्मिती केलेल्या मोनिका राजपूत, तान्याराद्झवा मुझारा आणि अम्मानुएल गेब्रेक्रस्तोस यांनी पेटंटसाठी अर्ज केला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर ग्लोव्हज्, लॅब कोट तसेच अन्य सर्जीकल साहित्यावरही करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे.

loading image