कोरोनाव्हायरस हा ‘सुपर स्प्रेडर’ रोग; संसर्गबाधिताकडून संक्रमण जास्त

corona is super spreader PNAS research
corona is super spreader PNAS research

बोस्टन - कोरोनाव्हायरस हा ‘सुपर स्प्रेडर’ घटकांमुळे होणारा रोग आहे. यामुळे या विषाणूच्या संसर्गाचा प्रसार वेगाने सर्वत्र झाला आहे. कोरोनाची महासाथ रोखण्यासाठी सामुदायिक कार्यक्रम रोखणे आवश्‍यक असल्याचे ‘पीएनएएस’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर लेखात म्हटले आहे.

संशोधनात ६० ‘सुपर स्प्रेडर’ आजारांचे विश्‍लेषण करण्यात आले. अभ्यासातील निष्कर्षानुसार शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या संसर्गाचे गणितीय प्रारुप विकसित केले आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या शैक्षणिक संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. दहा किंवा त्यापेक्षा कमी लोकांच्या जमाव मर्यादेमुळे संसर्गबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे या प्रारुपातून दाखविण्यात आले आहे.

संशोधन अभ्यासाचे वरिष्ठ लेखक जेम्स कॉलिन्स म्हणाले की, सुरुवातीला लक्षात आले त्यापेक्षा ‘सुपर स्प्रेडिंग’घटक हे जास्त महत्त्वाचे ठरत आहेत. याची संभाव्यता जास्त असून अपेक्षापेक्षा ते वारंवार उद्‍भवण्याची शक्यता असते. जर आपण अशा ‘सुपर स्प्रेडिंग’ घटकांवर नियंत्रण आणू शकलो तर सध्याची जागतिक साथ आटोक्यात येण्याची शक्यता मोठी आहे. ज्यांच्या संपर्कात आल्याने मोठ्या संख्येने लोक बाधित झाले आहेत अशा संक्रमकांना ‘सुपर स्प्रेडर’ म्हणतात.

सुपर स्प्रेडिंग घटकांचे माहिती घेताना आणि पूर्वी त्यांचे स्वरुप कसे होते याच्या विश्‍लेषणातून या आजाराशी लढताना आपले संभाव्य धोरण आणि साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिशा मिळू शकते.
फेलिक्स वाँग, संशोधन अभ्यासाचे सहलेखक 

कोरोनाव्हायरच्याबाबतीत साधारण एका संसर्गबाधितांकडून या विषाणूचा प्रसार इतर तीन लोकांमध्ये झाला आहे. म्हणजेच याची मूलभूत पुनर्निमाण संख्या तीन आहे. ही संख्या व्यक्तीनिहाय वेगळी असू शकते. काही व्यक्तींमधून याचा संसर्ग कोणालाही होत नाही तर ‘सुपर स्प्रेडर’ शेकडो जणांना संक्रमित करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com