esakal | अमेरिकेनं 'जॉन्सन'च्या लशीवरील बंदी उठवली; धोक्याचा इशारा बंधनकारक

बोलून बातमी शोधा

अमेरिकेनं 'जॉन्सन'च्या लशीवरील बंदी उठवली; धोक्याचा इशारा बंधनकारक

जॉन्सनची लस टोचल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याचे निदर्शनास आल्याने येथे लसीकरण मोहीम १४ एप्रिलपासून थांबविण्यात आली होती.

अमेरिकेनं 'जॉन्सन'च्या लशीवरील बंदी उठवली; धोक्याचा इशारा बंधनकारक
sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा वापर पुन्हा करण्यात येणार आहेत. जॉन्सनची लस टोचल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याचे निदर्शनास आल्याने येथे लसीकरण मोहीम १४ एप्रिलपासून थांबविण्यात आली होती. येथील आरोग्य खात्याने ११ दिवसांनंतर लशीवरील बंदी उठविली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीचा एकच डोस देण्यात येतो. या लशीमुळे होणाऱ्या संभावित नुकसानापेक्षा लाभ अनेक असल्याचे आढळल्याने त्यावरील बंदी उठविण्याची शिफारस विशेषज्ञांच्या समितीने केली होती.

अमेरिकेत ८० लाख नागरिकांनी ही लस देण्यात आली आहे. त्यापैकी १५ जणांच्या रक्तात वेगळ्या प्रकारच्या गुठळ्या झाल्याचे दिसून आले होते. हा त्रास होणाऱ्या सर्व महिला होत्या आणि बहुतेकजणी ५० वर्षांच्या आतील होत्या. यातील तीनजणींचा मृत्यू झाला तर सातजणी रुग्णालयात आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख जेनेट वुडकॉक यांनी ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) सह संयुक्त निवेदन शुक्रवारी(ता. २३) प्रसिद्घ केले. ‘‘कोरोनाशी लढा देण्यासाठी ‘जॉन्सन’ची लस महत्त्वपूर्ण आहे. मात्र ही लस घेण्याचा पर्याय निवडणाऱ्या तरुण महिलांना त्याच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात येईल.

हेही वाचा: भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही

अमरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आणि सीडीसीने लस वापरावर लावण्यात आलेली स्थिगिती उठवली आहे. मात्र लस देण्याआधी त्याचा धोका असल्याचा इशारा द्यावा लागेल. जॉन्सनची लस घेणाऱ्या महिलांना इतर लस वापरण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. त्याची निवड करण्याचं स्वातंत्र्य असेल. कोरोनाला रोखण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा एकच डोस प्रभावी ठरतो.