esakal | 'भारतात जाऊ नका', कोरोनाच्या उद्रेकामुळे अमेरिकेचा नागरिकांना सल्ला

बोलून बातमी शोधा

corona stop

भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगातील इतर देशांनी आता खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.

'भारतात जाऊ नका', अमेरिकेचा नागरिकांना सल्ला
sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगातील इतर देशांनी आता खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. ब्रिटनने भारतासह पाकिस्तान, बांगलादेशला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. तर अमेरिकेनंही त्यांच्या नागरिकांनासाठी नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. सीडीसीकडून जारी करण्यात आलेल्या या अॅडव्हायजरीमध्ये नागरिकांना भारतात प्रवास करणं टाळा असा सल्लाही देण्यात आला आहे. भारतात कोरोनाच्या दुसरी लाट आली असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

मेडिकल जर्नल द लँसेटमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात भारतात कोरोना संसर्गाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेसह अनेक देश सावध झाले आहेत. अमेरिकेच्या सीडीसीने म्हटलं आहे की, कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं होत असणारी वाढ लक्षात घेता देशातील नागिरिकांनी भारतात कोणत्याही प्रकारचा प्रवास करण्यापासून दूर रहावं. इतकंच नाही तर लस घेतलेल्या प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा आणि संसर्गाचा धोका असू शकतो. त्यामुळे भारतात कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळाच असंही म्हटलं आहे.

हेही वाचा: भारत बायोटेक अन्‌ सीरमला केंद्र सरकारकडून निधीची ‘लस’

सीडीसीने म्हटलं की, भारतात जाणं खूपच गरजेचं असेल आणि ते टाळता येत नसेल तर प्रवास करण्याआधी लस घ्या. अमेरिकेत सरकारने लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिका लवकरात लवकर सर्वांना लस देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी कसा करता येईल या दृष्टीने पावले उचलण्यास बायडेन सरकारने सुरवात केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, अमेरिकेच्या प्रत्येक नागरिकाला लस देणं हे आमचं ध्येय आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेत कोरोनाने रौद्ररुप धारण केलं होतं.

ब्रिटनने भारताला टाकलं रेडलिस्टमध्ये

भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने अनेक देशांची चिंता वाढवली आहे. ब्रिटनने भारताला रेड लिस्ट मध्ये टाकलं आहे. यामुळे नॉन ब्रिटिश आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनला जाण्यावर बंदी घातली आहे. परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या लोकांना हॉटेलमध्ये दहा दिवसांपर्यंत क्वारंटाइन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर हाँगकाँगने भारतातून येणा-जाणाऱ्या विमानांवर 20 एप्रिल ते 3 मेपर्यंत स्थगिती दिली आहे.

हेही वाचा: दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर दुपटीने वाढणार

ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द

भारतातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुढील आठवड्यातील भारत दौरा रद्द केला आहे. याबाबतचे वृत्त ‘डोविंग स्ट्रीट’ ने दिले आहे.भारत आणि ब्रिटनकडून प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जॉन्सन दूरध्वनीवरून संवाद साधतील.