esakal | निर्बंध बस झाले, आता कोरोनासोबत जगायला शिका- बोरिस जॉन्सन
sakal

बोलून बातमी शोधा

boris johnson

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटच्या (Coronavirus Delta Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी मोठी घोषणा केली आहे.

निर्बंध बस झाले, आता कोरोनासोबत जगायला शिका- बोरिस जॉन्सन

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लंडन- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटच्या (Coronavirus Delta Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी मोठी घोषणा केली आहे. 19 जुलैनंतर ब्रिटन पूर्णपणे अनलॉक होणार आहे. याअंतर्गत ब्रिटनमध्ये मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि इतर निर्बंध संपवले जातील. ब्रिटनने या दिवसाला मोठ्या उत्साहात साजरे करण्याचं ठरवलं आहे. असे असले तरी तज्त्रांनी ब्रिटनचे हे पाऊल आत्मघातकी असल्याचं म्हटलं आहे. (covid restrictions will ease mask free from 19 july boris johnson)

यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील (यूसीएल) सेंटर फॉर बिहेवियर चेंजचे डायरेक्टर प्रो सुसान मिची यांनी म्हटलं की, संक्रमणासोबत पुढे जाणे कोरोना उद्रेकाला आमंत्रण देण्यासारखं आहे. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी म्हटलं की, 19 जुलैपासून सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात येतील. त्यांच्या या घोषणेमुळे ब्रिटेनमधील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी कोरोनाच्या डेल्टा रुग्णांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा: Corona Update: 111 दिवसानंतर देशात सर्वात कमी नवे रुग्ण

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या जवळपास दीड वर्षांपासून महामारी थैमान घालत आहे. पण, आता आपल्याला कोरोनासोबत जगण्यास शिकायला हवं. सोशल डिस्टेंसिंग, मास्क आणि वर्क फ्रॉम होम असे नियम हटवले जातील, असं जॉन्सन म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी लोकांनी आपल्या कॉमन सेन्सचा वापर करावा. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत 24 हजार 248 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. जानेवारी महिन्यानंतरचे हे सर्वाधिक आकडे आहेत.

हेही वाचा: वाघ-अस्वलांना दिली कोरोना लस; वानरे आणि डुकरांनाही मिळणार

कोरोना म्हणजे फ्लू

आरोग्य मंत्री साजिद जावेद म्हणाले होते की, कोरोनासारख्या फ्लूला संपवणं अशक्य आहे. आरोग्य मंत्र्याच्या या वक्तव्यानंतर अँड्यूज युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर स्टीफन रीचन यांनी आश्चर्य व्यक्त केलं. कोरोनाला विषाणूला फ्लू म्हणणाऱ्या आरोग्य मंत्र्याचे वक्तव्य धक्कादायक आहे. फक्त 50 टक्के लसीकरणानंतर आपण स्वत:ला सुरक्षित मानू शकत नाही. दरम्यान, ब्रिटनमधील 3 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक लोकांना दोन्ही कोरोना प्रतिबंधक लशी मिळाल्या आहेत. 85 टक्क्यांपेक्षा जास्त वयस्कर लोकांचे लसीकरण झाले आहे. ब्रिटनमध्ये रुग्ण वाढत असले तरी मृत्यूचा दर कमी आहे. त्यामुळे लस आपलं काम करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

loading image