कोरोनानं लोक मरताहेत, तरीही बिल गेट्सना नफा हवाय?

bill gates
bill gatesfile photo

नवी दिल्ली- जगभरात कोरोना (corona) महामारीने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट (second wave) आली आहे. कोविडची बाधा झाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. अशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. असे असताना जगातील श्रीमंत व्यावसायिक आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Microsoft bill gates) यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. कोरोना लसीचा फॉर्म्युला (covid19 formulas) भारतासारख्या विकसनशील देशांना द्यायला नको, असं ते म्हणाले आहेत. (covid19 formulas not be sheared with India Microsoft bill gates)

स्काई न्यूजसोबत एका मुलाखतीदरम्यान बिल गेट्स यांना विचारण्यात आलं की, कोरोना महामारीला तत्काळ आणि प्रभावीपूर्ण पद्धतीने रोखण्यासाठी विकसनशील आणि गरीब देशांना लसीचा फॉर्म्युला दिला जावा का? यावर बिल गेट्स यांनी स्पष्टपणे 'नाही' असं म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.

bill gates
बिल-मेलिंडा गेट्स विभक्त; 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला निर्णय

बिल गेट्स म्हणाले की, ''जगात लस बनवणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि लोक लसीच्या सुरक्षेसंबंधी खूप गंभीर आहेत. असे असले तरी फॉर्म्युला द्यायला नाही पाहिजे. यूएसची जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी आणि भारतातील एका कंपनीमध्ये मोठा फरक असतो. आपले संशोधन आणि पैशाच्या माध्यमातून लस बनवली जाते. लशीचा फॉर्म्युला कोणत्या रेसिपीसारखा नाही, की तो सर्वांना दिला जावा. हा केवळ बौद्धिक संपदेचाही प्रश्न नाही. यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करावी लागते, ट्रायल घ्यावे लागतात.''

bill gates
हीच खरी श्रीमंती! बिल गेट्स बनले जगातले सर्वात मोठे शेतकरी

बिल गेट्स म्हणाले की, विकसनशील आणि गरीब देशांनी आणखी काही दिवस वाट पाहावी, पण त्यांना लसीचा फॉर्म्युला मिळू नये. स्काई न्यूजशी बोलताना गेट्स असंही म्हणाले की, विकसित आणि श्रीमंत देशांना कोरोनाची लस सर्वात आधी मिळत आहे, यात आश्चर्याचं काही नाही. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ३० वर्षांच्या व्यक्तींनाही कोरोनाची लस मिळाली आहे, दुसरीकडे ब्राझील-साऊथ आफ्रिकेत ६० वर्षांपुढील नागरिकांचेही अजून लसीकरण झालेले नाही. तीनचार महिन्यात कोरोनाने प्रभावित सर्व देशांना लस मिळण्यास सुरुवात होईल. दरम्यान, जगभरात कोरोनाचे थैमान सुरु असून हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. असे असतानाही बिल गेट्स व्यवहार पाहात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com