कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा लागला शोध, संशोधकांच्या अभ्यासात मोठा खुलासा | Zero Patient | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona first patient

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, संशोधकांच्या अभ्यासात मोठा खुलासा!

अवघ्या जगभरात कोरोना महामारीने (coronavirus) थैमान घातले आहे. अशातच या महामारीचा प्रसार सुरू झाल्यानंतर जगभरातल्या संशोधकांनी कोरोनाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. जगभरातल्या विविध ठिकाणी कोरोनाबाबत संशोधन (study of coronavirus) सुरू असून अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या अभ्यासामध्ये कोरोना उत्पत्तीबाबत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ज्यामध्ये कोरोना महामारीचा पहिला रुग्णाबाबत (corona first patient) दावा करण्यात आला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो जणांचा बळी

कोरोनाला मात देण्यासाठी सध्या जगभरात वेगानं लसीकरण (Coronavirus Vaccination) सुरू आहे. अशातही संशोधकांनी कोरोना महामारीच्या उत्पत्तीबाबतचं संशोधन थांबवलेलं नाही. महामारी सुरू होऊन जवळपास वर्ष झाल्यानंतर कोरोनाची तीव्रता काही प्रमाणात कमी करणारी लस निर्माण करण्यात संशोधकांना यश आलं. गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो जणांचा बळी घेतला. (corona first and second wave) चीनकडून सातत्यानं कोरोनाबाबतची माहिती लपविल्यानं जगाचा संशय अधिकच वाढला आहे. चीनमधली वुहान व्हायरोलॉजी लॅबही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हेही वाचा: समीर वानखेडेंना हायकोर्टाकडून धक्का; आर्यन खान प्रकरणी तपासावर प्रश्नचिन्ह

पहिला रुग्ण सर्वांत प्रथम 'हा' होता

कुठल्याही आजाराच्या पहिल्या रुग्णाला 'पेशंट झिरो' (patient zero) किंवा 'इंडेक्स पेशंट' असं म्हटलं जातं. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या रुग्णाबाबत विविध प्रकारे संशोधन करण्यात आलं होतं.अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या अभ्यासामध्ये कोरोना उत्पत्तीबाबत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. कोरोना महामारीचा पहिला रुग्ण चीनमधल्या वुहान सी फूड मार्केटमधला एक विक्रेता असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. अगोदर समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा पहिला रुग्ण वुहान सी फूट मार्केटमधला एक अकाउंटन्ट असल्याचं मानलं जातं होतं. आता नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार, वुहान सी-फूड मार्केटमधला एक विक्रेता कोरोनाचा 'पेशंट झिरो' होता. कारण, सर्वांत प्रथम वुहानमध्येच कोरोना महामारीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोविड-19 ला वुहान व्हायरसदेखील म्हटलं जात होतं. नंतर संशोधकांनी त्याचं नाव SARS-CoV-2 असं ठेवलं. .

हेही वाचा: मोदीच नाही तर गांधीही झुकलेत; बळीराजासाठी लढले होते बाबा टिकैत

वुहानच्या सीफूड मार्केटमधल्या एका विक्रेत्यामध्ये कोरोनाची लक्षणं

'जर्नल सायन्स' नावाच्या एका जर्नलमध्ये अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक मायकेल वोरोबी यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोरोनाचा पहिला रुग्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकाउंटन्टचं प्रकरण 16 डिसेंबर 2019 रोजी समोर आलं होतं; मात्र त्यापूर्वीच वुहानच्या सीफूड मार्केटमधल्या एका विक्रेत्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली होती.

loading image
go to top