
याआधी ब्रिटनने Pfizer-BioNTech च्या लशीला आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे.
लंडन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेकाद्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना व्हायरसवरील लशीला ब्रिटनमध्ये मान्यता दिली गेली आहे. या लशीला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिलाच देश ठरला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस परिणामकारक ठरत असल्याने या लशीला मंजूरी देण्यात आली आहे. आपत्कालीन वापरासाठी या 'कोविशिल्ड' लशीला मान्यता मिळाली आहे.
Oxford University/AstraZeneca’s Covid-19 vaccine approved by the United Kingdom regulator
"Govt has today accepted the recommendation from the Medicines and Healthcare products Regulatory Agency to authorise Oxford University/AstraZeneca’s Covid-19 vaccine for use," says UK Govt
— ANI (@ANI) December 30, 2020
पुढील आठवड्यात या लशीचे लशीकरण सुरु करण्यात येईल. याआधी ब्रिटनने Pfizer-BioNTech च्या लशीला आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे. ही लस आतापर्यंत 600,000 लोकांना दिली गेली आहे. ब्रिटनच्या Medicines and Healthcare products Regulatory Agency (MHRA)ने ही शिफारस केली होती, अशी माहिती ब्रिटन सरकारने दिली आहे.
हेही वाचा - coronavirus new strain : UK हून येणाऱ्या फ्लाइट्सला 7 जानेवारीपर्यंत 'रेड सिग्नल'
प्रसिद्ध केलेल्या एका वक्तव्यात एस्ट्राझेनेकाने म्हटलंय की, या लशीचा पहिला खुराक येत्या बुधवारपासून देण्यात येईल. जेणेकरुन नव्या वर्षात लवकरच लशीकरणास सुरवात होईल. ब्रिटनसोबत झालेल्या करारानुसार पहिल्या तिमाहीत लक्षावधी खुराक देण्याचा मानस आहे. एकूण 100 दशलक्ष खुराक असणार आहेत.
गेल्या आठवड्यातच कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडला होता. हा स्ट्रेन आधीच्या व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरतो. हा अधिक संसर्गजन्य असून त्याचा जगभरात प्रसार होत आहे. भारतात देखील या नव्या स्ट्रेनचे जवळपास 20 रुग्ण सापडले आहेत. भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटसोबत एस्ट्राझेनेकाची ही लस विकसित केली गेलीय. तशीच तिच्या चाचण्याही केल्या गेल्या आहेत. मात्र, अद्याप भारतात लशीला मान्यता मिळाली नाहीये. ब्रिटनमध्ये या लशीला मान्यता दिली गेल्यानंतर लवकरच भारतात देखील या लशीला मान्यता मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.