काश्‍मीर प्रश्‍नाशी "सीपीईसी'चा थेट संबंध नाहीच

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

सीपीईसी प्रकल्प हा आर्थिक बाबींशी निगडित असून, त्याचा हेतू शेजारील देशांशी आर्थिक सहकार्य वाढविणे आहे. त्याचा काश्‍मीर सीमा प्रश्नाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले

बीजिंग - पाकव्याप्त काश्‍मीरमधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) काश्‍मीर प्रश्नाशी थेट संबंध नसल्याचा खुलासा आज चीनने केला. वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) प्रकल्पात भारताचे स्वागत आहे, असेही चीनने म्हटले आहे.

सीपीईसी प्रकल्पास भारताकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चीनने हा खुलासा करत भारताची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला. ओबीओआर प्रकल्पाच्या उभारणीत भारताने सहभागी होण्यास चीनची हरकत नसून, सीपीईसी प्रकल्प हा आर्थिक बाबींशी निगडित असून, त्याचा हेतू शेजारील देशांशी आर्थिक सहकार्य वाढविणे आहे. त्याचा काश्‍मीर सीमा प्रश्नाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

या भागातील आर्थिक स्वरूपाच्या हालचालींचा सीपीईसी प्रकल्पाशी संबंध नसून, चीन-पाकिस्तान पूर्वीपासून आर्थिक स्वरूपाची मदत करत आला आहे. येथील आर्थिक हालचालींमागे शेजारील देशांचा विकास हा एकमेव हेतू असून, ओबीडीआरमध्ये सहभागी होण्यासाठी भारताला विविध पर्याय खुले असल्याचे वांग यी म्हणाले.

Web Title: CPEC not related to Kashmir, says China