क्‍यूबाच्या क्रांतिभूमीत साहित्यिकांची मांदियाळी

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

हवाना - क्‍युबातील जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करून सत्तेवर आलेल्या फिडेल कॅस्ट्रो यांची ही जन्मभूमी केवळ क्रांतीसाठी नव्हे, तर कसदार साहित्यिकांसाठीही तेवढीच प्रसिद्ध आहे. ही भूमी अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होती. जगप्रसिद्ध साहित्यिकांची प्रतिभा या युद्धभूमीत फुलली हे लक्षात येते.

हवाना - क्‍युबातील जुलमी सत्तेविरुद्ध संघर्ष करून सत्तेवर आलेल्या फिडेल कॅस्ट्रो यांची ही जन्मभूमी केवळ क्रांतीसाठी नव्हे, तर कसदार साहित्यिकांसाठीही तेवढीच प्रसिद्ध आहे. ही भूमी अनेक लेखकांचे प्रेरणास्थान होती. जगप्रसिद्ध साहित्यिकांची प्रतिभा या युद्धभूमीत फुलली हे लक्षात येते.

"हेलिंग हिमसेल्फ फ्रॉम हिमसेल्फ'?' ही कविता लिहिणारे क्‍यूबाचे कवी उमर परवेझ यांच्यासारखे अनेक साहित्यिक, कलावंत या देशाशी संबंधित आहेत. या प्रामुख्याने अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे नाव घेता येईल. 1899 ते 1961 या काळातील बरीच वर्षे त्याने क्‍यूबात घालविली आहेत. त्यांचे निवासस्थानही येथे होते. त्यांच्या साहित्यकृतींपैकी अनेक महत्त्वाचे साहित्य येथेच निर्माण झाले आहे. त्यांना क्‍यूबाबद्दल प्रेम होते. ते स्वतःला क्‍यूबन नागरिक समजत असत. क्‍यूबन नागरिकांशी आपले भावनात्मक नातेवाईक आहे, असे हेमिंग्वे समजत असे.

क्‍यूबात ही कलाकारांची खाण आहे. स्थानिक आदिवासी जमातींशिवाय आफ्रिका, स्पेन येथून आलेल्या नृत्य, संगीत, धर्म, भाषा, वास्तुशास्त्र आदी कला येथे रुळल्या. लिव्हरपूल येथील कवी मारिनो विल्सन जे याने "द पोएट' या कवितेत जॉन लीनन, शेरलॉक होम्स, ऑसविच, शेक्‍सपिअर, लुईस आर्मस्ट्रॉंग यांची नाळ क्‍यूबाच्या संस्कृतीशी जुळलेली होती, असे सांगितले आहे. अनेक कवींनी येथील चित्रण त्यांच्या कवितांमध्ये केलेले दिसते. जुआन नावाच्या कवीने गुलामगिरीचे वर्णन त्याच्या कवितेत केले आहे. एडमुंडो डेसनोज हे क्‍यूबातील प्रसिद्ध कादंबरीकार समजले जातात. त्यांची "मेमरिज ऑफ अंडरडेव्हलपमेंट' ही कादंबरी प्रथम "इनकन्सोलेबल मेमरिज' या नावाने 1967 मध्ये प्रसिद्ध झाली होती. स्पॅनिश भाषेतून ती अनुवादित केली होती.

मार्क्वेझ-कॅस्ट्रो मैत्री
कोलंबियाचे लेखक ग्रॅब्रियल गारशिया मार्क्वेझ व क्‍यूबाचे दिवंगत माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्यात मैत्रीचे नाते होते. कॅस्ट्रो यांच्या क्रांतीचा त्यांना अभिमान होता. पण, त्यांच्या अनिर्बंध सत्तेवर मार्क्वेझ टीका करीत असत.

Web Title: cuba, the land of literature