क्यूबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

हवाना - क्‍यूबाचे क्रांतिकारी नेते आणि माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो (वय 90) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. फिडेल कॅस्ट्रो यांचे भाऊ आणि सध्याचे क्यूबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली.

क्यूबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी सरकारी वाहिनीवरून फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल बोलताना सांगितले, की क्यूबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे शुक्रवारी रात्री दहा वाजून 29 मिनिटांनी निधन झाले. फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो यांच्या हाती 2008 मध्ये सत्ता देण्यापूर्वी सुमारे 50 वर्षे क्यूबावर एकहाती वर्चस्व राखले होते. एप्रिल महिन्यांत फिडेल यांनी कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये शेवटचे भाषण केले होते.

Web Title: Cuba's Fidel Castro, former president, dies aged 90