
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून न्यूयॉर्क मधील सर्व शाळा यंदाच्या शिक्षण सत्रापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जगभरात खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशात अमेरिकेतही कोरोनाने थैमान घातले असून न्यूयॉर्क या हॉटस्पॉट शहरातील सर्व शाळा यंदाच्या सत्रात बंद ठेवण्याचा निर्णय न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू कुओमो यांनी घेतला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर न्यूयॉर्क तेथील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु गेल्या एक महिन्यांपासून मृतांच्या संख्येत घट होत असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. पण स्टे होम म्हणजेच नागरिकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एंड्रयू कुओमो यांनी राज्यातील सर्व शाळा अधिकाऱ्यांना सांगितले की, राज्यातील प्रत्येक शाळेतील स्वच्छता कशा प्रकारे करता येईल. सोशल डिस्टेंसिंगचे नियम कसे पाळले जातील. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये या सर्व महत्त्वाच्या विषयांवर योजना तयार करण्यात येतील यावर भर द्यावा. शिवाय, काही आठवड्यात त्या लागू करण्यात येतील असं देखील त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.