अहमदाबादच्या कॉल सेंटरमधून 300 दशलक्ष डॉलरचा गंडा

पीटीआय
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

याप्रकरणी तीन वर्षे तपास करण्यात आला. बनावट कॉल केल्याप्रकरणी व चुकीची माहिती सांगून फसवणूक करणे आदी गुन्हे कॉल सेंटरवर लावण्यात आले आहेत.

वॉशिंग्टन : भारतातील पाच कॉल सेंटरवर अमेरिकेतील नागरिकांचे 300 दशलक्ष डॉलर चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे अमेरिकेतील होमलॅंड सुरक्षा दलाचे सचिव जेह जॉन्सन यांनी सांगितले. पाच कॉल सेंटरमधील जवळपास 56 लोक यामध्ये सामील आहेत. यामध्ये 31 जण भारतीय नागरिक आहेत, तर अमेरिकेमधून 20 जणांना याप्रकरणी अटक केली असून, त्यामध्ये बहुतांश जण हे भारतीय असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

पाच कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांचे लाखो डॉलरचा गैरव्यवहार करणाऱ्यांची टोळीच कार्यरत होती. अहमदाबाद येथील पाच कॉल सेंटरमधून अमेरिकेतील होमलॅंड सुरक्षा दल, अंतर्गत महसूल विभाग आणि इतर प्रशासकीय कार्यालयांना कॉल करण्यात आले. या वेळी बनावट अटक वॉरंट, हद्दपारी व थकीत कर आदी सुस्थितीत करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली, असे जॉन्सन यांनी सांगितले. याप्रकरणाचे हजारो जण पीडित आहेत, तर 300 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त पैशांचा बेकायदा व्यवहार झाला असल्याचेही ते म्हणाले.

कर विभागाचे खजिना निरीक्षक (टीआयजीटीए), होमलॅंड सिक्‍युरिटी, विधी विभाग, अंतर्गत महसूल विभाग फेडरल ट्रेड कमिशन आदी विभागांनी याप्रकरणी लेखी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी तीन वर्षे तपास करण्यात आला. बनावट कॉल केल्याप्रकरणी व चुकीची माहिती सांगून फसवणूक करणे आदी गुन्हे कॉल सेंटरवर लावण्यात आले आहेत.

ही आहेत बनावट कॉल सेंटर
एच ग्लोबल, कॉल मंत्रा, वर्ल्डवाइड सोल्युशन, झोरियन कम्युनिकेशन आणि शर्मा बीपीओ सर्व्हिसेस या कॉल सेंटरमधून अमेरिकेमध्ये बनावट कॉल करण्यात आले होते.

Web Title: Cyber Crime from Ahmedabad; case registered in US