Cyber Crime : 300 हून अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस; काम न केल्यास अमानुष छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime
Cyber Crime : 300 हून अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस; काम न केल्यास अमानुष छळ

Cyber Crime : 300 हून अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस; काम न केल्यास अमानुष छळ

थायलंडमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांना ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या नागरिकांकडून सायबर गुन्हे करवून घेतले जात आहेत. त्यांनी हे गुन्हे करण्यास नकार दिल्यास त्यांचा अमानुष छळ केल्याचीही माहिती मिळत आहे.

हेही वाचा: Leicester: ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड! भारतीय समुदाय आक्रमक; कारवाईची मागणी

ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्याचसोबत इतर देशातले काही नागरिकही आहेत. या भारतीयांमध्ये ६० लोक तामिळनाडूमधले आहेत. ओलीस ठेवलेल्या या लोकांकडून भारत सरकारकडे आपल्याला सुखरुप सोडवण्यासाठीच्या याचना केल्या जात आहे.

हेही वाचा: कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा असल्याचा दावा; हिरा परत द्यावा अशी मागणी

ओलीस ठेवण्यात आलेल्या काही भारतीयांना म्यानमारच्या म्यावाडी इथं हलवण्यात आलं आहे. इथल्या लोकांचा तिथे नेऊन छळ केला जात आहे. काम करण्यास नकार देणाऱ्यांना शॉक देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Cyber Crime More Than 300 Indians Are Being Hostage In Thailand Forced Into Cyber Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cyber CrimeThailand