esakal | पुढील 15 दिवसांत देशात कोरोनाचा उद्रेक; दिवसाला 5 हजार रुग्णांचा मृत्यू?

बोलून बातमी शोधा

corona patients

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. दररोज हजारो लोकांचा या विषाणूमुळे जीव जात आहे. अशात एका अभ्यासातून चिंताजनक दावा करण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात भारतामध्ये दिवसाला जवळपास 5000 हजार रुग्णांचा मृत्यू होईल, असं अभ्यासात म्हणण्यात आलंय

पुढील 15 दिवसांत देशात कोरोनाचा उद्रेक; दिवसाला 5 हजार रुग्णांचा मृत्यू?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन- देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. दररोज हजारो लोकांचा या विषाणूमुळे जीव जात आहे. अशात एका अभ्यासातून चिंताजनक दावा करण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात भारतामध्ये दिवसाला जवळपास 5000 हजार रुग्णांचा मृत्यू होईल, असं अभ्यासात म्हणण्यात आलंय. त्यामुळे चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसात भारतात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळणार आहे. 10 मेपर्यंत कोरोना मृतांची संख्या दिवसाला 5,600 पर्यंत जाईल, असा दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या Institute for Health Metrics and Evaluation (IHME) ने केला आहे. तसेच 15 एप्रिलपासून देशात रुग्णांच्या मृत्यचे प्रमाण वाढत जाईल आणि ऑगस्टपर्यंत 6,65,000 रुग्णांचा मृत्यू होईल, असं अभ्यासान सांगण्यात आलंय.

वाईट परिस्थितीत देशात 1 ऑगस्टपर्यंत कोरोना विषाणूमुळे 7,29,000 रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच मास्कचा वापर वाढवल्यास ही हानी कमी केली जाऊ शकते. शिवाय लसीकरणाची गती वाढवल्यास किंवा मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास 85,000 लोकांचा जीव वाचू शकतो. ऑगस्टपर्यंत जवळपास 70 कोटी लोकांचे लसीकरण केले जाईल, असं आयएचएमईच्या अभ्यासात सांगण्यात आलंय.

हेही वाचा: डॉक्‍टरांना अपेक्षा मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिव्‍हिरची

देशात सरासरी 970 रुग्णांची नोंद होत होती, पण गेल्या दिवसात यात वाढ झाली असून सरासरी 1500 रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. तसेच 12 एप्रिलपर्यंत देशातील 24 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा आयएचएमईने केला आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. विशेषत: महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात दिवसाला 60 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे.

हेही वाचा: हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटच्या उभारणीस सुरूवात

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून ती अधिक धोकादायक असल्याचं दिसून येत आहे. हॉस्पिटलच्या सुविधा तोकड्या पडत आहेत. शिवाय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देशातील पॉझिटिव्हिटी रेट 5.37 टक्के झाला आहे, जो फेब्रुवारीच्या सुरुवातीला 1.50 टक्के होता. देशात आतापर्यंत 189,544 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात शनिवारी (ता.24) दिवसभरात 3 लाख 49 हजार 691 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 69 लाख 60 हजार 172 एवढी झाली आहे. सलग चौथ्या दिवशी तीन लाखाहून कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.