तरुण-तरुणींचा डान्स सुरू असताना बेछूट गोळीबार, चिमुकल्यासह १२ जणांचा मृत्यू; घटनेचा धक्कादायक VIDEO VIRAL
Mexico Firing News : सेंट जॉन द बाप्टिस्टच्या सन्मान सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
मेक्सिकोत एका सेलिब्रेशनच्या कामात गोळीबाराची घटना घडलीय. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अचानक बंदुकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. मृतांमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. मेक्सिकोतील गुआनजुआटो इथं हा गोळीबार झाला.