युरोपमध्ये "जनरल विंटर'ने घेतले 20 बळी

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

पूर्व युरोपातील पोलंडमध्ये हाडे गोठविणाऱ्या या हिवाळ्यामुळे किमान 10 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. रशियाच्या काही भागांमधील रात्रीचे तापमान उणे 30 अंशांपर्यंत खाली घसरले आहे. रशियामधील या वर्षीचा "ऑर्थोडॉक्‍स ख्रिसमस' हा गेल्या 120 वर्षांतील सर्वाधिक थंड असल्याचे आढळून आले आहे

लंडन - युरोप खंडामध्ये घसरलेल्या तापमानानंतर अतिथंडीची जोरदार लाट आली असून यामुळे आत्तापर्यंत येथील विविध देशांत 20 पेक्षाही जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तुलनात्मकदृष्ट्या उबदार तापमान असलेल्या ग्रीक बेटे व दक्षिण इटलीमध्येही या हिवाळ्यात हिमवृष्टी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. घसरलेल्या तापमानाचा तुर्कस्तानलाही फटका बसला आहे.

पूर्व युरोपातील पोलंडमध्ये हाडे गोठविणाऱ्या या हिवाळ्यामुळे किमान 10 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. रशियाच्या काही भागांमधील रात्रीचे तापमान उणे 30 अंशांपर्यंत खाली घसरले आहे. रशियामधील या वर्षीचा "ऑर्थोडॉक्‍स ख्रिसमस' हा गेल्या 120 वर्षांतील सर्वाधिक थंड असल्याचे आढळून आले आहे. झेकोस्लोव्हाकिया व बर्ल्गेरिया या देशांमधील हिवाळ्याचा प्रभाव लक्षणीयरित्या जाणवला आहे.

ग्रीसमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या स्थलांतरितांना या कठोर हिवाळ्याचा फटका बसला आहे. गेल्याच आठवड्यातात ग्रीसमधील एका अफगाण स्थलांतरिताचा अतिथंडीमुळे मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले होते. स्थलांतरितांना राहण्यासाठी तात्पुरती उबदार निवासस्थाने पुरविण्यात येत आहेत. कडक हिवाळ्यामुळे युरोपातील काही शहरांमधील विमानतळ बंद करण्यात आले आहे.

Web Title: Deadly winter kills more than 20 in Europe