Delta Atlanta Flight Delays : अमेरिकेत तांत्रिक समस्या सुरूच, अटलांटा विमानतळावर डेल्टा एअर लाइन्सच्या विमानांना उड्डाणासाठी विलंब, प्रवाशांचे हाल

FAA Update : रविवारी डेल्टाच्या विमानांचे वजन व संतुलन मोजणाऱ्या ऑटोमेशन प्रणालीत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे अटलांटाच्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन विमानतळावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या डेल्टा विमानांना विलंब झाला.
Delta Air Lines Flight Delays at Atlanta Airport

Delta Air Lines Flight Delays at Atlanta Airport

esakal

Updated on: 

अमेरिकेतील विमान वाहतुकीवर तांत्रिक समस्यांचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. रविवारी अटलांटामधील हार्ट्सफील्ड-जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'डेल्टा एअर लाइन्स'च्या विमान सेवांमध्ये मोठा व्यत्यय निर्माण झाला. विमानाचे वजन आणि संतुलन (Weight and Balance) मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑटोमेशन प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे डेल्टाच्या सर्व विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. या प्रकारामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागले.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...