Dhaka bomb blast : भीषण बॉम्बस्फोटाने बांगलादेशचं ढाका हादरलं!; भर बाजारपेठेत अज्ञाताने फेकला 'क्रूड बॉम्ब'

Crude Bomb Attack in Dhaka : आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत ; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Security personnel inspect the blast site after a crude bomb explosion in a crowded Dhaka marketplace, triggering panic among civilians.

Security personnel inspect the blast site after a crude bomb explosion in a crowded Dhaka marketplace, triggering panic among civilians.

esakal

Updated on

Massive Bomb Blast in Dhaka Crowded Marketplace: बांगलादेशमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत आहे. अल्पसंख्यांकांवर अत्याचार सुरू आहेत. तर हिंसाचार, जाळपोळ आदी घटनाही वाढल्या आहेत. त्यात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी असणाऱ्या ढाकामध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, भीषण बॉम्बस्फोटाने ढाका शहर हादरले आहे. येथील मघ बाजारातील उड्डाणपुलाजवळ हा बॉम्बस्फोट झाला असून, यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला झाला आहे. तर या स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे.

बाजारात गर्दी असताना हा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण बाजारात एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड पळापळ सुरू झाली. पोलिस आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात नेले.

Security personnel inspect the blast site after a crude bomb explosion in a crowded Dhaka marketplace, triggering panic among civilians.
Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ढाकाच्या मघबाजार भागात उड्डाणपुलावरून अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर क्रूड बॉम्बच्या स्फोटामुळे एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्ती एका खासगी दुकानात काम करणारा कर्मचारी होता, जो उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर चहा पीत होता. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com