हिंदू न्यायाधीश सक्तीच्या रजेवर

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

बांगलादेश सरकारशी सुरेंद्रकुमार सिन्हांचा वाद

ढाका : बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयातील पहिले हिंदू सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांना तेथील सरकारने सक्तीच्या रजेवर जाण्यास भाग पाडल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवरील महाभियोगप्रकरणी सिन्हा यांनी संसदीय प्राधिकरणच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्या या निर्णयामुळे तेथील सरकार नाराज झाले आहे.

माझ्याबाबतीत जे काही घडले त्यामुळे मी निराश झालो असून, सरकारने मी आजारी असल्याचे पुढे केलेले कारण खोटे असल्याचे त्यांनी नमूद केले. सिन्हा हे गुरुवारी रात्री ऑस्ट्रेलियास रवाना झाले. मी न्यायव्यवस्थेचा पालक असून, तिचा विचार करूनच मी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी पुन्हा मायदेशी परतेन, असेही सिन्हा यांनी सांगितले. मी यापूर्वी दिलेल्या निकालाचा सरकारने चुकीचा अर्थ लावला असून, यामुळे पंतप्रधान शेख हसिना नाराज झाल्या आहेत; पण लवकरच त्यांना सत्य समजेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सिन्हा यांनी प्रथमच लेखी निवेदन प्रसिद्ध करत आपली बाजू मांडली आहे. तत्पूर्वी बांगलादेश सरकारनेच सिन्हा हे 3 ऑक्‍टोबरपासून महिनाभराच्या आजारपणाच्या रजेवर जात असल्याचे जाहीर केले होते.

म्हणून वाद चिघळला
याच वर्षी जुलै महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 16 वी घटनादुरुस्ती बेकायदा ठरवत, न्यायाधीशांवरील महाभियोगप्रकरणी संसदीय प्राधिकरण बरखास्त केले होते. सिन्हा यांच्या घटनापीठानेच हा निर्णय दिला होता. यावर बांगलादेशातील बड्या राजकीय नेत्यांनी जोरदार टीका केली होती. या वेळी सिन्हा यांनी पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे उदाहरण दिल्याने हा वाद आणखी चिघळला होता.

Web Title: dhaka news Hindu judge on forced leave