

YouTuber Dhruv Rathee announces plans for a protest at Parliament Square in London amid demonstrations linked to the demand for Chief Election Commissioner Gyanesh Kumar's resignation and developments surrounding his 2018 defamation case
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतात आलेले यूट्यूबर ध्रुव राठी आता लंडनमध्ये दाखल झाला. कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे भारतात आगमन झाले होते. मात्र, गुरुग्राम येथील निवासस्थानी त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्याच रात्री त्यांची सुटका झाली. आता लंडनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी, “आता आंतरराष्ट्रीय ढोल वाजवण्याची वेळ आली आहे,” असे म्हटले आहे.