गलवान खोऱ्यातील संघर्षात 80 चिनी सैनिक ठार झाले होते? फोटो व्हायरल

China, Chinese soldiers
China, Chinese soldiers

लडाखमध्ये काही दिवसांपुर्वी भारतीय लष्कर आणि चीनी लष्कर आमनेसामने आले होते. यामध्ये बिहार रेजिमेंट आणि आईटीबीपीच्या जवानांनी मोठं शौर्य दाखवलं होतं. भारतीय लष्कराने चीनच्या जवळजवळ 80 जवानांना यमसदनी धाडलं होतं. आता याबद्दलचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल झालेल्या  फोटोत चीनच्या झिनजियांग प्रांतात पुरल्या गेलेल्या 80 हून अधिक सैनिकांच्या कबरी दिसल्या आहेत. तज्ञांचा असा दावा आहे की या कबरी चिनी सैनिकांच्या आहेत जे गलवान खोऱ्यातील संघर्षात मरण पावले होते. यापुर्वीही एका चीनी सैनिकाच्या कबरीचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यावर 'चीन-भारत सीमा संरक्षण संघर्ष' मध्ये या सैनिकाचा मृत्यू झाल्याचे लिहिले गेले होते. ज्यावर 'चीन-भारत सीमा संरक्षण संघर्ष' मध्ये या सैनिकाचा मृत्यू झाल्याचे लिहिले गेले होते. चला तर नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया .. 

चिनी ट्विटरवर व्हायरल होत आहेत फोटो-

15 जून रोजी गलवान खोऱ्यातील चीनसोबतच्या हिंसक चकमकीत 20 भारतीय सैनिक शहिद आणि चीनचे 40 हून अधिक सैनिकही ठार झाले होते. भारताने त्यावेळेस शहीद झालेल्या सैनिकांची संख्या जाहीर केली होती, परंतु चीनने आजपर्यंत आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांविषयी कोणतीही माहिती दिली नाही. आता पहिल्यांदाच चीनी सैनिकांच्या कबरींची फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.'चिनी ट्विटर' असणारे Weibo या  मायक्रो ब्लॉगिंग साइटवर व्हायरल होत असलेल्या चिनी सैनिकांच्या कबरीची फोटो चीनचा खोटेपणा उघड करीत आहे. 'या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण दिले.' असं त्या कबरीवर लिहलं होतं. 

कबरीवर 'चीन-भारत सीमा संरक्षण संघर्ष' असा उल्लेख-

चीनी प्रकरणातील एका तज्ञाने असा दावा केला आहे की गलवानमध्ये मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांच्या कबरी दर्शविणारे एक चित्र इंटरनेटवर शेअर केले जात आहे. हे फोटो चीनच्या मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर शेअर केले गेले आहे असा दावा चिनीचे कामकाज तज्ज्ञ एम टेलर फ्रेवेल यांनी केला आहे. यामध्ये दिसणारी कबरी 19 जूनच्या चिनी सैनिकाची आहे जी जून 2020 मध्ये 'चीन-भारत सीमा संरक्षण संघर्ष' मध्ये मरण पावली होती. तो फुझियान प्रांताचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. टेलरने असेही म्हटले आहे की फोटोमध्ये दिसलेल्या कबरीत सैन्याच्या युनिटचे नाव  69316 ही आहे, जे गलवानच्या उत्तरेस, चिप-आर्क व्हॅलीमध्ये तियानवेन्दियन सीमा संरक्षण कंपनी असल्याचे दिसते.

झिनजियांगच्या सॅटेलाईटमधून दिसल्या 80 कबरी-
 

टेलरने आणखी एका स्रोताचा हवाला देत सांगितलं की त्या कबरी 13 व्या सीमा संरक्षण रेजिमेंटचा भाग आहेत.  त्यांनी असाही दावा केला आहे की, 2015 मध्ये केंद्रीय सैनिकी कमिशनने युनिटचे नाव युनाइटेड कॉम्बॅट मॉडेल कंपनी असे ठेवले होते. त्यांनी असंही लिहिलं आहे की चीनने गलवान खोऱ्यात कोणत्या युनिट्सची तैनाती केली होती हे यावरून दिसते.दरम्यान, चीनच्या झिनजियांग प्रांतातील होटन भागातील पिशॉन काउंटीमध्ये सॅटेलाईट फोटोमध्ये या कबरी उघडकीस आल्या आहेत. असा दावा केला जात आहे की या कबरी गलवानमध्ये मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांची आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com