भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट

वृत्तसंस्था
Monday, 31 August 2020

भारत व चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत घुसखोरीचा डाव प्रयत्न हाणून पाडला.

लडाख: भारत व चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत घुसखोरीचा डाव प्रयत्न हाणून पाडला. मुजोर चीनची दादागिरी सुरूच आहे.

Video: चीनचा सर्वात शक्तीशाली टँक बुडाला 30 सेकंदात...

भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती असून, चिनी सैनिकांच्या कुरापती सुरूच आहेत. भारतीय जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. सीमेवरील स्थिती निवळावी यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर विविध बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये पूर्ण सैन्य माघारीला तयार असल्याचे चीनकडून दाखवण्यात आले. मात्र, २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पँगाँग तलाव परिसरात घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु, चिनी सैनिकांना भारतीय जवानांनीही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले.

गलवान खोऱ्यानंतर चीनने आपले सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केले होते. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्याने ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आले आहे.

हाय मित्रांनो; आम्ही चीनच्या सीमेवर चाललोय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india and china stand off china troops clashes again in eastern ladakh

Tags
टॉपिकस
Topic Tags: