esakal | Live Video: तुझ्या शरीरावर थुंकणार पण नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

director khalil ur rehman abuses journalist marvi sirmed on air for supporting at pakistan

एका टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान एकाने महिलेला शिवीगाळ करत अश्लील टिप्पणी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Live Video: तुझ्या शरीरावर थुंकणार पण नाही...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कराची (पाकिस्तान): एका टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान एकाने महिलेला शिवीगाळ करत अश्लील टिप्पणी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमध्ये महिला एकत्र येऊन त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत. महिला मोर्चे काढत असून, त्यांची 'मेरा जिस्म मेरी मर्जी' अशी त्यांची टॅगलाईन आहे. या आंदोलनावरून एका पाकिस्तानी न्यूज चॅनलने लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पाकिस्तानचे दिग्दर्शक व लेखक खलील उर रेहमान यांच्यासह या आंदोलनाच्या प्रमुख मारवी सिरमत फोनलाईनवरून उपस्थित होत्या. रेहमान बोलत असताना मध्येच सिरमत बोलल्यामुळे रेहमान यांनी अश्लिल टिप्पणी करण्यास सुरवात केली. ते म्हणाले, 'तुझं शरीर आहे तरी काय? तुझ्या सारख्या महिलेच्या शरीरावर कुणी मर्द थुंकणार पण नाही.'

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी रेहमान यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये लाईव्ह कार्यक्रमादरम्यान अनेकदा वादावादीचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले आहे. याबाबतचे व्हिडिओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत.

Video: युवती बघता-बघता कशी गायब होते पाहा...

loading image