Video: युवती बघता-बघता कशी गायब होते पाहा...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

अभिनेता अनिल कपूर यांनी मि. इंडिया चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच एक युवती बघता-बघता गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, हा चमत्कार नसून, विज्ञानाचा नवा शोध आहे.

लंडन: अभिनेता अनिल कपूर यांनी मि. इंडिया चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच एक युवती बघता-बघता गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, हा चमत्कार नसून, विज्ञानाचा नवा शोध आहे.

भारतीय जुगाडापैकी जेसीबीचा एक व्हिडिओ व्हायरल...

फिजिक्सि एस्ट्रोनॉमी डॉट ओआरजी ने ट्विटरवरून हा व्हिडिओ 25 फेब्रुवारी रोजी शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख 74 हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये एक युवती आपल्या हातात पारदर्शक कपड्यांसारखे काहीतरी घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा कपडा गुंडाळल्यानंतर ही युवती बघता-बघता गायब होताना दिसते. पण, हा कपडा पारदर्शक असल्यामुळे युवती गायब होत असल्याचा केवळ भास होत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या कपड्याची मागणी केली आहे.

Video: शिपाई अधिकाऱयाला चपलेने मारतच राहिला...

दरम्यान, या नव्या प्रयोगामुळे कोणालाही मिस्टर इंडियाप्रमाणे गायब होता येणार आहे. शिवाय, यावर चित्रपटही येणार आहे. पण, हा चमत्कार नाही तर विज्ञानाचा नवा शोध आहे. विज्ञान एवढे प्रगत झाले आहे की ते जादूगारांपेक्षा कमी नाही.

Video: दोघे जण माझ्या मागे बसले आहेत...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: future technology girl invisible with in second using cloth video viral