Dirty act in Restaurant: ईईई.. जेवणातील खाद्यपदार्थांवर घासायचा गुप्तांग अन् करायचा लघवी! मोठ्या हॉटेलमधील वेटरचं किळसवाणं कृत्य

Dirty act in Restaurant: अमेरिकेतील कॅन्सस शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने जेवताना लघवी करत असल्याची कबुली दिली आहे.
Dirty act in Restaurant
Dirty act in RestaurantEsakal

Dirty act in Restaurant: आपण सर्वजण खूप आवडीने बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो. पण या हॉटेल्समध्ये कधी अस्वच्छता, घाणरडापणा दिसून येतो. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील कॅन्सस शहरातील एका हॉटेलमध्ये समोर आला आहे. एका हॉटेलमध्ये काम करणारा एक वेटर असे घाणेरडे काम करत असे की, हे समजल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. 21 वर्षीय जेस क्रिस्टियन हॅन्सनने कबूल केले की, तो जेवणामध्ये त्याच्या प्रायव्हेट पार्टला घासायचा. याशिवाय जेवताना लघवी करायचा. हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाउस रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कबूल केले की, त्याने सॅल्मन फिशवर त्याचे प्रायव्हेट पार्ट घासले आणि सॉस, लोणच्यामध्ये लघवी केली.

त्याने असे प्रकार जवळपास 20 वेळा केल्याचे कबूल केले आहे. त्याने सांगितले की डेटिंग ॲप्स आणि फेटिश वेबसाइटवरील त्याचे मित्र त्याला असे कृत्य करण्यास सांगत होते. पोलिसांनी एका वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओची थंबनेल पाहिले होते. व्हॅन्डलायझर नावाच्या युजरने हा व्हिडिओ वेबसाईटवर टाकला होता.

Dirty act in Restaurant
YouTube Fake Views : यूट्यूब व्हिडिओंचे व्ह्यूज वाढवण्यासाठी घेतले चक्क 4,600 फोन; कोट्यवधींच्या कमाईनंतर फुटलं बिंग

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवर आपले प्रायव्हेट पार्ट घासताना दिसत आहे. याशिवाय त्याने जेवणात लघवी केल्याचे दिसते. त्याने अन्नपदार्थ पायाने तुडवले आणि नंतर ते लोकांना खाण्यासाठी दिले होते. व्हिडीओजची टायटल सुद्धा सारखीच होती, 'पिसिंग इन द सॉस', पिसिंग इन द रेस्टॉरंट फूड. एफबीआयने प्रथम हॅन्सनचा फोन नंबर काढला आणि नंतर त्याचा माग काढला आणि तो हेअरफोर्ट हाऊसमध्ये काम करत असल्याचे शोधून काढले. रेस्टॉरंटच्या पार्किंग एरियात त्याच्या नावाचे एक रजिस्टरही सापडले आहे.

Dirty act in Restaurant
PoKमध्ये पोलीस-आंदोलकांमध्ये चकमक, एका पोलिसाचा मृत्यू... वीज अन् पिठाच्या किंमती वाढल्यामुळे आंदोलक रस्त्यावर

पोलिसांनी हॉटेलच्या प्रमुखाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हे त्यांच्याच रेस्टॉरंटमधील जेवण होते जे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर हॅन्सन यांना बोलावण्यात आले. त्या दिवशीही तो स्वयंपाकघरात काम करत होता. पोलिसांनी हॅन्सनचे शूज हे आधीच्या तीन व्हिडिओंमध्ये घातलेले शूज म्हणून ओळखले. हॅन्सनने केलेल्या घाणेरड्या कृतीची कबुली दिली आहे.

हॅन्सनने सांगितले, लोक त्याला ग्राइंडर आणि स्निफी सारख्या ॲप्सवर हे करण्याची विनंती करतात. यानंतर तो अश्लील कृत्य करत व्हिडिओ बनवून पोस्ट करत असे.

Dirty act in Restaurant
International Nurses Day 2024 : जिच्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिवस साजरा केला जातो ती फ्लोरेंस नाइटेंगल कोण होती?

त्याने असेही सांगितले की, तो हॉटेलमध्ये हस्तमैथुन करायचा पण त्याने कधीही अन्नात स्पर्म टाकले नाही. हे काम आवडत नसल्याने असे प्रकार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, घाणेरडे काम केल्याने त्याला काम आवडू लागले. ही बाब त्याच हॉटेलमधील ग्राहकांना समजल्यावर ते चांगलेच नाराज झाले. हॅन्सनला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅन्सनला 13 महिने तुरुंगवास आणि 1 लाख डॉलर्सचा दंड भरावा लागू शकतो. त्याच वेळी, 140 जणांनी कबूल केले आहे की तो जेव्हा असे कृत्य करत असे तेव्हा त्यांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com