शपथविधीचं निमंत्रण नव्हे; शांततेची चर्चा महत्त्वाची : पाकिस्तानची भूमिका

पीटीआय
बुधवार, 29 मे 2019

नरेंद्र मोदी यांच्या 2014 ला झालेल्या शपथविधीच्या वेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहिले होते. 

इस्लामाबाद : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण न देण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकिस्तानने फारसे महत्त्व न देता निमंत्रणापेक्षा चर्चा महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. तसेच, देशांतर्गत राजकारणामुळे मोदी हे इम्रान यांना निमंत्रण देऊ शकत नाहीत, असा दावाही पाकिस्तानने केला आहे. 

गुरुवारी (ता. 30) होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमाला भारताने "बिम्सटेक' गटातील देशांना बोलाविले आहे. भारतासह बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ हे सात देश या गटाचे सदस्य असून, पाकिस्तानचा यात समावेश नाही. पाकिस्तानला निमंत्रण नसल्याबद्दल त्यांचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना विचारले असता ते म्हणाले, की शपथविधीच्या निमंत्रणापेक्षा काश्‍मीर, सियाचीन आणि सर क्रिक खाडी या मुद्द्यांवरील वाद मिटविण्यासाठी भेटणे अधिक महत्त्वाचे आहे.

निवडणूक प्रचारात मोदींना पाकिस्तानवर सातत्याने तोंडसुख घेतले होते. त्यामुळे इतक्‍या लगेच ते त्या भूमिकेतून बाहेर येतील, अशी आशा करणे चुकीचे आहे. देशांतर्गत राजकारणामुळे ते असे निमंत्रण देऊ शकत नाहीत. 

नरेंद्र मोदी यांच्या 2014 ला झालेल्या शपथविधीच्या वेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with Peace is Most Important says Pakistan