
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी मावदिवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांची शनिवारी भेट घेतली. हिंदी महासागरातील महत्त्वाच्या द्विपकल्पीय देश असलेल्या मालदिवबरोबर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोवाल यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. यासंबंधीचे ट्विट मालदिवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने केले.
कोलंबो - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी मावदिवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांची शनिवारी भेट घेतली. हिंदी महासागरातील महत्त्वाच्या द्विपकल्पीय देश असलेल्या मालदिवबरोबर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोवाल यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. यासंबंधीचे ट्विट मालदिवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारत, श्रीलंका आणि मालदीव देशांच्या सागरी सुरक्षा सहकार्यविषयक चौथी बैठक आजपासून कोलंबो येथे सुरू झाली आहे. श्रीलंकेकडे यजमानपद असलेल्या या बैठकीतील चर्चांत हिंदी महासागर विभागातील सुरक्षा विषयक मुद्यांवर भर दिलेला आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर सुरु झालेल्या या त्रिपक्षीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
चिनी शास्त्रज्ज्ञांनी तोडले अकलेचे तारे; कोरोना व्हायरस भारतातूनच पसरल्याचा केला दावा
कायदेशीर नियम, शोध व बचाव कार्य, सागरी प्रदूषण, माहितीची देवाणघेवाण, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या अवैध वाहतुकीवर निर्बंध आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
Edited By - Prashant Patil