धक्कादायक! रशियात तब्बल एवढ्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

पीटीआय
गुरुवार, 28 मे 2020

वाईट काळ संपला - पुतिन
रशियातील कोरोना संसर्गाच्या संक्रमणच्या उच्चांकाचा कालावधी संपला आहे. देशाचा वाईट काळ आता इतिहासजमा झाला आहे, असा विश्‍वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व्यक्त केला आहे. कोरोनामुळे स्थगित केलेली विजय परेड आता पुढील महिन्यात आयोजित करण्याचे आदेश पुतिन यांनी दिले आहे. हा दिवस जर्मनीच्या पराभवाबद्धल साजरा केला जातो. यंदा या विजयाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने ९ मे रोजी लाल चौक येथे शानदार सोहळ्याचे आयोजन केले होते. परंतु कोरोनामुळे हा सोहळा स्थगित केला होता. ही परेड आता २४ जूनला होणे अपेक्षित आहे.

आरोग्य खात्यातील ३०० हून कर्मचारी मृत्युमुखी; पण आकडेवारीविषयी शंका
मॉस्को - रशियात कोरोना संसर्गामुळे १०१ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. अर्थात या आकडेवारीवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यांच्या मते, मृतांचा आकडा यापेक्षा अधिक असू शकतो. दरम्यान, रशियाचा वाईट काळ आता संपला आहे, असे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. रशियात साडेतीन लाखाहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रशियातील आरोग्य विभागाने संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी ऑनलाइनवर प्रसिद्ध केली जात आहे. गेल्या शुक्रवारी १०१ आणखी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. या यादीत  ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यात १०१ डॉक्टरांचा समावेश आहे.

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण

देशाच्या आरोग्य मंत्रालयाने संसदीय मंत्रालयास मृत आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद ठेवली जात असल्याचे सांगितले होते. परंतु यंदा प्रथमच नावाची यादी आरोग्य खात्याने प्रसिदध केलीआहे. 

रुग्णसंख्येच्या क्रमवारीत रशियाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत ३,६०,००० हून अधिक नागरिकांना बाधा झाली असू ३,८०७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृत्यूदरात घट झाली असून त्याच्या आकडेवारीवरही शंका निर्माण केली जात आहे.

कोविडमुळे दक्षिण कोरियात मुलांना नवा आजार? 

राजकीय कारणावरून खरे आकडे समोर येत नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात रशियाच्या अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले असून मृत्यू दरात झालेली घट हे रशियाच्या प्रयत्नांचे फळ असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor death by coronavirus in rasia