रुग्णासाठी डॉक्टर झाला 'बॅटमॅन'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 17 November 2020

सध्या इंटरनेटवर डॉक्टर आणि एका चिमुरड्या रुग्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या इंटरनेटवर डॉक्टर आणि एका चिमुरड्या रुग्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे बरेच नेटकरी भावनिक झाले आहेत. फील गुड पेजने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि ऑनलाइन उपलब्ध झाल्यानंतर काही तासांतच तो हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कॅन्सरच्या एका छोट्या रुग्णाची आणि त्याच्या डॉक्टरांची गोष्ट आहे, या डॉक्टराने लहान मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॅटमॅनची वेशभूषा केली होती. यापुर्वी त्या मुलाला डॉक्टरने सर्वात मोठ्या इच्छेबद्दल विचारले असता, कॅन्सरग्रस्त असलेल्या मुलाने डॉक्टरांना सांगितले की, त्याला बॅटमॅनला भेटण्याची इच्छा आहे. यामुळेच डॉक्टरने त्या मुलाला बरं वाटावं म्हणून चक्क बॅटमॅनची वेशभूषा परिधान केली होती.

'इतक्यात नाहीच... कोरोनातून सावरायला आणखी वेळ लागणार' 

'डॉक्टर कॅन्सरच्या रुग्णाला विचारतात की त्याचं स्वप्न काय आहे त्यानंतर मुलगा म्हणतो की त्याला बॅटमॅनला भेटायचं आहे. लगेच दुस-या दिवशी डॉक्टर सुपरहिरो बॅटमॅनच्या वेशभूषेत कपडे घालतात आणि मुलाचं स्वप्न पूर्ण करतात," असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

कोरोनामुळे होतायत रक्ताच्या गुठळ्या; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

इंटरनेटवरील प्रतिक्रिया-
या लहान व्हिडिओला शेकडो लाइक्स मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना अश्रू अनावर झाले. ' नदीही रडत आहे, किती सुंदर आणि चांगली माणसे या जगात आहेत' अशी एक प्रतिक्रिया या व्हिडिओला आली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor dressed like batman after wish of child cancer patient